Friday, April 26, 2024
Homeजळगाव१५ मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये प्रशिक्षण केंद्रे बंदच

१५ मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये प्रशिक्षण केंद्रे बंदच

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात सहा मार्च पर्यंत रात्रीची १० ते पहाटे ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असून ती आता १५ मार्च पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच या काळात सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे बंदच राहतील असा आदेश आज दि.६ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने संचारबंदीत वाढ झाली आहे. यादरम्यान अभ्यासिका ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील, कोविड १९ नियमावलीचे पालन करून सर्व प्रकारच्या परिक्षा, चाचण्या घेता येतील, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी यांना बंदीच.

सर्व धार्मिक स्थळे १० लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत खुली, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बगीचे, बंद, आठवडे बाजारही बंद राहतील. मार्केटमध्ये नियमांचे पालन होणे गरजेचे, लग्न समारंभांना मागील नियम यापुढेही पाळावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या