Monday, April 29, 2024
Homeजळगाव8 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार

8 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतचे शाळांचे वर्ग सुरु करावयाचे असल्याने शाळास्तरावर शाळा समिती व पालक-शिक्षक संघ यांची सभा घेवून विविध बाबींची पडताळणी करुन येत्या 8 डिसेंबरपासून शाळा सुरु होण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात इयत्ता 9 ते 12 वीपर्यंत शाळांचे वर्ग सुरु करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळा समितीमार्फत अहवाल मागविण्यात येणार आहे. तसे शिक्षण विभागाने पत्र दिले आहे.तसेच काही मार्गदर्शक सूचनांची पुरतता करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

- Advertisement -

बी.जे. पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी, जळगाव

जळगाव शहरासह जिल्ह्यात इयत्ता 9 ते 12 वीपर्यंत शिकविणारे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणी चाचणी करुन घेण्यात आली आहे का ? व त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे विलगीकरण करण्यात आले आहे का ? याची खात्री करावी.

तसेच विद्यार्थी शाळेत येणेबाबत वर्गशिक्षकांनी पालकांचे संमतीपत्र घेतले आहेत, याची सुद्धा खात्री करावी. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण, साबण, पाणी, इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करुन घेण्यात आली आहे.

या पाहणी करावी. थर्मलमीटर हे कॅलीर्बटेड कान्टेक्टलेन्स इनफॉरेड डिजीटल थर्ममीटर असावे. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवून केल्याची खात्री करावी.

पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे का? याची शाळा समितीने पडताळणी करुन अहवाल शिक्षण विभागाला द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या