Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकVideo : धावत्या स्कूल व्हॅनमधून निघाला धूर; पाच विद्यार्थी बालंबाल बचावले

Video : धावत्या स्कूल व्हॅनमधून निघाला धूर; पाच विद्यार्थी बालंबाल बचावले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंधरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये शाळा सुरु झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही धोक्यातच असल्याचे चित्र दिसून येत आहे…(school reopen in nashik)

- Advertisement -

आज दुपारी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (mhasrul police station) हद्दीत काकासाहेब देवधर कॉलेज (kakasaheb deodhar college) समोर एका धावत्या स्कूल व्हँनने पेट (School van burn) घेतल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक माहिती अशी की, देवधर महाविद्यालयासमोरून एम एच 15 जी व्ही7667 ही गाडी पाच विद्यार्थ्यांना घेऊन जात होती.

अचानक कारच्या बोनेटमधून धूर बाहेर येऊ लागल्याने चालक अशोक संपत नवले (वय 55 रा. शिवशक्ती नगर सिडको) यांनी खाली उतरून गेट उघडून तात्काळ गाडी मधील असलेल्या पाच विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

तसेच एक महिलेला यांना तात्काळ खाली उतरवले. तत्काळ गाडीच्या बाहेर सर्वजण आल्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, कार पूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन विभागाला (Fire dept) मिळाल्यानंतर एक गाडी याठिकाणी दाखल झाली यानंतर आग विझवण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या