Thursday, April 25, 2024
Homeनगरजनशक्तीचे महामार्गावर शाळा भरो आंदोलन

जनशक्तीचे महामार्गावर शाळा भरो आंदोलन

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

बालमटाकळी ते कांबी रस्त्यासाठी आज अनोखे महामार्गावर शाळा भरो आंदोलन जनशक्ती विकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

- Advertisement -

बालमटाकळी ते कांबी रस्त्याचे काम त्वरित व्हावे या मागणीसाठी आज जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व अ‍ॅड.विद्याधर काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे महामार्गावर शाळा भरो आंदोलन व एकेरी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, राजेंद्र पातकळ, संजय आंधळे, अशोकराव ढाकणे, लक्ष्मण पातकळ, गुलाबराव दसपुते, हरिभाऊ फाटे, माणिक गर्जे, अकबर भाई शेख, विजय लेंडाळ, राहुल लेंडाळ, विठ्ठल सौंदर, संतोष गंगाधर, गणेश गाडे, विक्रम गरड, सर्जेराव घोरपडे, मनोहर बामदळे, मनोज घोंगडे, नवनाथ खेडकर, बाळासाहेब नरके, रासपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ, बाबासाहेब मस्के, पोपट बागडे, विश्वास लेंडाळ, जगन्नाथ लेंडाळ, गंगा गरड, दुर्गाजी रसाळ, भाऊसाहेब राजळे, सौ.सविता लेंडाळ, सुवर्णा लेंडाळ, रेणुका बागडे, अंजली लेंडाळ, नीता लेंडाळ, जयश्री सौंदर, अलका काळे, सिंधू गंगाधर, रेश्मा पठाण यांच्यासह शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी दोन ते अडीच तास रस्त्यावर शाळा भरून शाळकरी मुलांनी शिक्षण घेतले व शासनाचे लक्ष वेधले. यावेळी लहान चिमुकल्या विद्यार्थीनी सोनाली घनवट, गायत्री बागडे, वृषाली सौंदर आदींनी रस्त्यासाठी गाणी गायली. तर सोनाली घनवट हिने अत्यंत पोट तिडकीने रडत रडत रस्त्याच्या प्रश्नामुळे आमच्या वस्तीवरील कुटुंबांचे झालेले हाल यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यावेळी अ‍ॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, विजय लेंडाळ, भाऊसाहेब सातपुते, माणिक गर्जे, हरिभाऊ फाटे, कारभारी मरकड आदींची भाषणे झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात असंख्य ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता. शासनाचे लेखी आश्वासनाप्रमाणे लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त करून आपला संताप व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या