Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रशाळांच्या सुट्यांचा घोळ संपला, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नियोजन

शाळांच्या सुट्यांचा घोळ संपला, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नियोजन

शिक्षण विभागाने ऐन वेळी दिवाळीच्या सुट्ट्यांच्या (Diwali holiday)तारखांत बदल केल्यामुळे शाळांच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होणार आहे. दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाने १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला होता. त्यानुसार, शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून, विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने राज्यातल्या शाळांना दिवाळीची सुट्टी (Diwali holiday)प्रथमच जाहीर केली. हा अधिकार स्थानिक पातळीवर होता. परंतु आता राज्य शासनाने 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे दोन्ही पैकी कोणत्या सुट्या द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या तिघांना अटक

- Advertisement -

अखेरी स्थानिक पातळीवर दिवाळीच्या सुटीबाबत काढण्यात अालेले यापूर्वीचे पत्र रद्द करण्यात अाले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक शाळांना दिवाळीची सुटी राहणार आहे.

शिक्षण विभागात जिल्हास्तरावर उडालेल्या या गोंधळामुळे दिवाळीची सुटी केव्हा जाहीर करायची? याबाबत शिक्षकही संभ्रमात होते. राज्यात अशाप्रकारे वेगवेगळे आदेश गेल्याने त्याची दखल घेत अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ग्रामीण व शहरातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना गुरुवार 28 अाॅक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला.

अशी झाली अनन्याची आर्यनशी ओळख

- Advertisment -

ताज्या बातम्या