Friday, April 26, 2024
HomeनाशिकSinnar News : शाळकरी मुलीची त्रासाला कंटाळून आत्महत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर...

Sinnar News : शाळकरी मुलीची त्रासाला कंटाळून आत्महत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

वावी | संतोष भोपी | Vavi

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) शहा येथील एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीने (School Girl) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली असून गुन्ह्याची परिस्थिती गंभीर असल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट वावी पोलीस ठाण्यावर (Vavi Police Station) मोर्चा काढत मयत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मदतीने मयत मुलीचा मृतदेह (Dead Body) अंत्यसंस्कारासाठी ताब्यात देण्यात आला…

- Advertisement -

Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, शहा (Shah) येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी नवनाथ जाधव (१६) हिला आत्महत्येस प्रवृत्ती केले म्हणून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैष्णवी हिने आत्महत्या करण्यापूर्वी संशयित (Suspect) आरोपी वैभव विलास गोराणे (१८), अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८) व एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा चिठ्ठीमध्ये उल्लेख करून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.

Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा

संशयित आरोपी वैभव गोराणे याने त्याच्या मित्रांबरोबर मयत वैष्णवी हिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी करत घरात जाऊन गच्ची पकडून आणि वैष्णवी हिला तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’ अशी धमकी देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यानंतर वावी पोलिसांनी (Vavi Police) संशयित वैभव गोराणे आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

Sharad Pawar : “मी कृषिमंत्री असताना कधी…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

तर संबंधित संशयितांवर कारवाई होण्यासाठी शहा येथील ग्रामस्थांनी (Villagers) वावी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत त्यांना कठोर शिक्षा व्हावी याचा आग्रह धरला. त्यानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी संशयित आरोपींवर कडक कारवाई होईल असे आश्वासन देत अंत्यसंस्कारासाठी (Funeral) विनवणी केली.

Eknath Shinde : “…तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले; मुख्यमंत्री शिंदेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपींवर भादवि कलम ३०५,३०६,४५२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पोलीस हवालदार गोविंद सूर्यवाड, शैलेश शेलार, शहाजी शिंदे करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sanjay Raut : “दीडशहाणे मंत्री…”; दादा भुसेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप

- Advertisment -

ताज्या बातम्या