Saturday, April 27, 2024
Homeनगरदहा पेक्षा कमी पट असणार्‍या 161 शाळांवर टांगती तलवार

दहा पेक्षा कमी पट असणार्‍या 161 शाळांवर टांगती तलवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या तब्बल 161 शाळा आहेत. यातील काही शाळांत केवळ 2 ते 5 पर्यंतच पट आहे. त्यामुळे या शाळा बंद होण्याची टांगती तलवार आहे. 1 ते 10 पटसंख्या असणार्‍या सर्वाधिक 40 शाळा अकोले तालुक्यात, 20 शाळा पाथर्डीत, 20 संगमनेरात, 12 शेवगावमध्ये, तर 13 श्रीगोंदा तालुक्यात आहेत.

- Advertisement -

शहरासह आता ग्रामीण भागात खासगी शाळा वाढू लागल्याने, तसेच शिक्षणाप्रती पालकांची जागरूकता वाढल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. राज्यातील तब्बल 15 हजार जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी झाल्याचे मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आकडेवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थी शेजारच्या शाळेत वर्ग करण्याचे, तसेच शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन करण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी शासनाने माहिती मागवली होती.

परंतु त्यास विरोध झाल्याने तुर्तास शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केलेल्या नाहीत. परंतु अजूनही जिल्हा परिषदेच्या अशा अनेक शाळा आहेत, जेथील विद्यार्थीसंख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 564 शाळा आहेत. यातील 161 शाळांत 10 पेक्षा कमी पट आहे, तर 612 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. म्हणजे 773 शाळा या 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय नको म्हणून शासनाने या शाळा अजून सुरू ठेवलेल्या आहेत.

सर्वाधिक शाळा 21 ते 50 पटातील

एकूण 3 हजार 564 शाळांपैकी सर्वाधिक 1561 शाळा या 21 ते 50 पटातील आहेत. म्हणजे साधारण 50 टक्के जिल्हा परिषदेच्या शाळांत सरासरी 30 ते 40 एवढाच पट आहे.

665 शाळांत 100 पेक्षा जास्त पट

50 टक्केहून अधिक जिल्हा परिषद शाळांचा पट कमी झालेेला असला तरी 665 शाळा अशा आहेत ज्यांचा पट 100 पेक्षा जास्त आहे. यात सर्वाधिक 77 शाळा नेवाशातील आहेत.

11 ते 20 पटसंख्येच्या 612 शाळा

जिल्ह्यात 11 ते 20 पटसंख्येच्या 612 शाळा आहेत. त्यात अकोले 108, जामखेड 24, कर्जत 55, कोपरगाव 10, नगर 36, नेवासा 13, पारनेर 87, पाथर्डी 78, राहाता 3, राहुरी 28, संगमनेर 39, शेवगाव 44, श्रीगोंदा 79, श्रीरामपूर 8 अशा शाळांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या