Nashik Accident News : एसटी बसचा अपघात; शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) येथील जामदरी शिवारात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा (State Transport Corporation Bus) अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शाळकरी मुले व काही प्रवाशी जखमी झाल्याचे समजते…

Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच.१४ बीटी ३८०६ ही गिरणा डॅमकडून (Girna Dam) नांदगावकडे येत असताना सदर बस जामदरी फाट्याजवळ (Jamdari Phata) आली असता बसचे पाटे तुटल्याने हा अपघात (Accident) झाला. या बसमध्ये अंदाजे ५० ते ५५ प्रवाशी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बसमधील सर्व शाळकरी मुले चाकोरी येथील कर्मवीर भाऊसाहेब विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे.

…तर पाकिस्तान करणार ‘INDIA’ नावावर दावा? काय आहे प्रकरण?

दरम्यान, या अपघातात शाळकरी मुले आणि प्रवाशांसह चालक शांताराम सोनवणे आणि वाहक योगेश गरुड हे किरकोळ जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Nandgaon Rural Hospital) उपचार सुरु आहेत. तर अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maratha Andolan : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *