Saturday, April 27, 2024
Homeनगरशालेय दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची लगबग

शालेय दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची लगबग

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जुन महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षे चालू होत आसल्याने शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी पालक, विद्यार्थी सेतू केंद्रात गर्दी करु लागले आहेत .

- Advertisement -

साधारणपणे जून महिन्यात शैक्षणिक वर्षे चालू होते. परंतु चालूवर्षी करोनामुळेे वेळापत्रक बादलले आसल्याने शाळा प्रवेशाची प्रक्रिया थोडी उशीराने चालू होत आहे. नुकताच दहावी व बारावीचे ऑनलाईन निकाल लागले असुन विद्यार्थी पुढील वर्षीच्या तयारीला लागले आहेत. शाळेतुन गुणपत्रक व शाळा सोडण्याचा दाखला मिळेपर्यत विविध प्रकारचे लागणारे दाखले काढण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची लगबग वाढली आहे. यामुळे सेतु केंद्र सध्या चांगलेच गजबजलेले दिसत आहेत.

शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशा विविध दाखले लागतात. यात उत्पन्न दाखला, डोमासाइल, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलियर, जातीचे दाखले, शेतकरी, अल्प भूधारक, 30 टक्के महिला आरक्षण आदी दाखल्यांचा सामावेश आसतो. स्वताचे व कुटुंबातील व्यक्तीची कागदपत्रे व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आदी ठिकाणची काही कागदपत्रे जोडल्यावर तहसील कार्यालयातुन आवश्यक ते दाखले मिळतात. त्या दाखल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे शिकण्यासाठी व विविध सवलती मिळण्यासाठी उपयोग होतो.

ऑनलाईन निकाल लागला असून अजून प्रत्यक्ष निकालपत्र हातात मिळायला वेळ आहे. तसेच आजुन काही प्रवेश परिक्षा होणे बाकी आसल्याने या मधल्या कालावधीत विद्यार्थी पालक विविध दाखले गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय ,तलाठी कार्यालय सेतू व तहसील कार्यालयांमध्ये चकरा मारताना दिसत आहेत. या काळात सरकारी कार्यालयातील सर्व्हर वीज व्यवस्थीत चालली आसल्याने दाखले वेळत मिळत आहेत.

विद्यार्थी पालक यांनी फॉर्मला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली व सरकारी सर्व्हर वीज व्यवस्थीत चालले तर वेळेत दाखले मिळतील. अथवा वेळेच्या अगोदरही मिळतील. विद्यार्थी पालक यांनी प्रवेश प्रक्रिया चालू होण्यास कालावधी आसल्याने व शेवटी धावपळ नको असल्याने वेळेत दाखले काढून घेणे योग्य असल्याचे सुपा येथील सेतु केंद्र चालक राजू ढवळे यांनी सांगितले.

दाखले मिळण्याचा कालावधी

उत्पन्न दाखला (3 दिवस), डोमासाइल (3 दिवस), राष्ट्रीयत्व दाखला (3 दिवस), नॉन क्रिमीलियर (10 ते 15 दिवस), जातीचे दाखले (10 ते 15 दिवस), शेतकरी असल्याचा दाखला (3 दिवस), अल्प भूधारक (3 दिवस), 30 टक्के महिला आरक्षण दाखला (3 दिवस).

- Advertisment -

ताज्या बातम्या