Wednesday, April 24, 2024
Homeनगर52 हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

52 हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला आता 20 जुलैचा मुहूर्त लाभाला आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यात 372 केंद्रावर इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि इयत्ता आठवीचे (पूर्व माध्यमिक) अशा दोन परीक्षेसाठी 52 हजार 251 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहे.

- Advertisement -

जिल्हा पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी 52 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून यात पाचवीचे (पूर्व उच्च प्राथमिक) 223 केंद्रावर 32 हजार 238 विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे (पूर्व माध्यमिक) 149 केंद्रावर 20 हजार 13 परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या 17 हजार 551 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क 29 लाख 99 हजार हा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची तब्बल 11 वेळा ऑफ आणि ऑनलाईन सराव परीक्षा घेतलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी परिक्षा केंद्र निश्चित करतांना येण्या-जाण्याच्यास सोयीस्कर अशा शाळांची परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

विद्यार्थी आणि परीक्षा केंद्र कंसात

नगर 3 हजार 182 (32), संगमनेर 5 हजार 254 (44), नेवासा 3 हजार 897 (22), पाथर्डी 3 हजार 358 (25), पारनेर 3 हजार 148 (16), राहुरी 3 हजार 98 (22), कर्जत 2 हजार 906 (18), जामखेड 2 हजार 602 (13), कोपरगाव 5 हजार 576 (38), श्रीरामपूर 2 हजार 737 (23), अकोले 4 हजार 478 (23), श्रीगोंदा 3 हजार 191 (25), शेवगाव 2 हजार 589 (17), राहाता 3 हजार 757 (30), आणि मनपा 2 हजार 478 (12) असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या