Friday, April 26, 2024
Homeनगरशिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी - भडांगे

शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी – भडांगे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी याकरिता सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देणार असल्याची ग्वाही शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल भडांगे यांनी पालकांना दिली आहे.

- Advertisement -

विशाल भडांगे यांनी सांगितले की, शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे. याबाबत पालकांनी अर्ज भरण्या संदर्भातील वास्तवता आमचे निदर्शनास आणून दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्याकरिता लागणार्‍या कागदपत्रांपैकी बोनाफाईड हा एक अति महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस शाळा, कॉलेजेस बंद होते. आता काहीसे पूर्ववत सुरू होत आहे. शाळा, कॉलेजमध्ये बोनाफाईड दाखला काढण्याकरिता गेले असता अनेक पालकांना शालेय महाविद्यालय फी भरण्याची अट घातली जाते. फ़ी भरल्यानंतरच आपणास बोनाफाईड दिले जाईल, असे साचेबद्ध उत्तरही पालकांना ऐकावे लागत आहे.

सध्या करोना महामारीमुळे अपवाद वगळता बहुसंख्य पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. कौटुंबिक आर्थिक बजेट कोसळले असतानाच शालेय फी, महाविद्यालयीन फी भरायची कशी? असा प्रश्न अनेक पालकांना दररोज भेडसावत आहे. त्यातच आता शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत असल्याने अनेक पालकांना फी भरणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी हवा असलेल्या बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणे अशक्य व कठीण आहे. या समस्येकडे विद्यार्थी व पालक हतबल झाले असून शिष्यवृत्ती न मिळाल्यास अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पालकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ येईल.

त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यास अजून मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा पालकांची शासनाकडे आहे. विद्यार्थी व पालकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे याप्रश्नी लक्ष देणार असून त्यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळवून देत विद्यार्थी व पालक यांचा शिष्यवृत्ती अर्ज दाखल करणे संदर्भातील प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष विशाल भडांंगे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या