Saturday, April 27, 2024
Homeनगरयंदा 42 कोटींनी टंचाईकृती आराखडा घटला

यंदा 42 कोटींनी टंचाईकृती आराखडा घटला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुबलक पावसानंतरही जिल्ह्यात उन्हाळ्यात जिल्ह्यात काही भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला आहे.

- Advertisement -

यासाठी त्यांनी नियोजनानुसार ऑक्टोबर 2020 ते जून 2021 पर्यंतचा जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 8 कोटी 11 लाख रुपयांचा कोटी रुपयांचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास मान्यता मिळाली असून समाधानकारक पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत 42 कोटींची घट आली आहे.

जिल्ह्यात यंदा 261 गावे, 853 वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईची शक्यता जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला आहे. याठिकाणी टंचाई कृती आराखड्यात 379 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्यासाठी 8 कोटी 11 लाखांचा खर्च अपेक्षीत आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग ऑक्टोबर महिन्यापासून पुढील जून महिन्यांत कोणत्या तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, याची माहिती संकलित करून त्यानुसार संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकार्‍यांची मान्यता घेते. यंदा ऑक्टोबर 2020 ते जून 2021 चा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यंदाच्या आरखड्यात बुडक्या खोण्यास शून्य तरतूद करण्यात आली असून विहीर खोलीकरणाचा अवघा एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासह खासगी विहीर अधिगृहनाचे 83 प्रस्ताव घेण्यात आले आहेत. चालू वर्षी मुबकल पावसानंतरही जिल्ह्यातील 138 गावे आणि 686 गावात सरकारी टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

यासाठी सहा कोटी 35 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 261 गावे, 853 वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईची शक्यता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला आहे. यासाठी टंचाईकृती आराखड्यात 379 उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. साधारण मार्चनंतर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गतवर्षी याच पाणी पुरवठा विभागाने कमी पावसामुळे 50 कोटीचा टंचाईकृती आरखडा तयार केला होता.

असा आहे आराखडा

विहीर खोलीकरण 1 गाव, 5 वाड्या आणि 1 उपाययोजना 25 हजारांची तरतुद.

खासगी विहीर अधिगृहण करणे 83 गावे, 102 वाड्या आणि 172 उपाययोजनेसह 86 लाख 40 हजारांची तरतुद.

बैलगाडीवरील टँकरव्दारे पाणी पुरवठा 17 गावे, 2 वाड्या आणि 39 उपाययोजनेसह 17 लाखांची तरतूद.

टँकरव्दारे पाणी पुरवठा 138 गावे, 686 वाड्या आणि 138 उपाययोजना 6 कोटी 35 लाखांची तरतूद.

प्रगतीवरील पाणी योजना शिघ्रपणे पुर्ण करणे 7 गावे आणि 7 उपाययोजन आणि तरतूद शुन्य.

नळपाणी योजना विशेष दुरूस्ती 5 गावे, 28 वाड्या आणि 6 उपाययोजना 16 लाखांची तरतूद.

नवीन बोअरवेल घेणे 6 वाड्या, 6 उपायोजना आणि 3 लाख 30 हजारांची तरतूद.

तात्पूर्ती पूरक पाणी योजना 7 गावे, 24 वाड्या आणि 10 उपायोजनेसह 53 लाख रुपयांची तरतूद.

- Advertisment -

ताज्या बातम्या