Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश

ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश

मुंबई –

अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा

- Advertisement -

लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, करोना संकटामुळे शाळा महाविद्यालये बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमानुसार 75 प्रत्यक्ष हजेरीची अट पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती. यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या