Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रप्रभू प्रेमाचे व्यक्त स्वरूप - संत दर्शन सिंह जी महाराज

प्रभू प्रेमाचे व्यक्त स्वरूप – संत दर्शन सिंह जी महाराज

सावन कृपाल रुहानी मिशनचे प्रमुख संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी दयाल पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिकागो, अमेरिका येथून सोशल माध्यमामार्फत पावन संदेश समस्त मानवजातीला दिला. त्यांच्या सत्संगापूर्वी पूजनीय माता रीटाजी यांनी दादू साहब यांच्या दिव्य वाणी मधून ‘अजहुं न निकसे प्राण कठोर’ चे गायन केले.

नव्या ‘ब्रेक द चेन’चे काय आहेत नियम जाणून घ्या

- Advertisement -

संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी असे म्हटले की, संत दर्शन सिंहजी महाराज यांनी अध्यात्माचा मार्ग लाखो करोडो लोकांना समजाविला. जेव्हा कधी आपण त्यांचे स्मरण करतो तेव्हा त्यांचे दिव्य प्रेम, त्यांची करुणा आणि दया आपणास त्यांच्याकडे नेहमी आकर्षित करते.

संत दर्शन सिंहजी महाराज असे इच्छित होते की, आपण जीवनाच्या उद्देशाला जाणून घ्यावे आणि याच जन्मी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावे. आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी व पिता परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी नरदेह एक सुवर्णसंधी आहे. संत दर्शन सिंहजी महाराज यांच्यासारखे महापुरुष आपल्याच उद्देश पूर्ती करता या धरतीवर येतात. असे महापुरुष जेव्हा कधी येतात तेव्हा ते आपल्या प्रेमाने आपल्या सर्वांच्या जीवनात एक परिवर्तन घडवितात.

32 वर्षांपूर्वी संत दर्शन सिंह जी महाराज महासमाधी मध्ये गेले. परंतु त्यांची शिकवण आणि प्रेम सदैव आपल्या बरोबर राहील. आपण नरदेहाचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपल्या ध्येयाची पूर्तता करावी असे ते इच्छित होते. याकरिता जो मार्ग ते आपणास दाखवून गेले आहेत त्या मार्गावर आपण सर्वांनी जलद गतीने पाऊले पुढे टाकली पाहिजे.

याप्रसंगी शांती अवेदना सदन, राज नगर, नवी दिल्लीमध्ये कॅन्सर पीडित रोगी, बदरपुर स्थिती गुरु विश्राम वृद्धाश्रमातील वृद्ध आणि इब्राहिमपूर बुराडी मध्ये स्थित श्रीनिवास संस्कृत विद्यापीठातील मुलांना मिशनद्वारे औषधे, फळे, भाज्या व अन्य उपयोगी वस्तूंचे मोफत वितरण केले गेले.

मिशन आणि जीवन कार्य-

संत दर्शन सिंह जी महाराज यांनी हुजुर बाबा सावन सिंह जी महाराज आणि परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या नावे ‘सावन कृपाल रूहानी मिशन’ ची स्थापना केली. संत दर्शन सिंह जी महाराज यांनी संतमताची पुरातन काळातील शिकवण केवळ एका साध्या सोप्या पद्धतीनेच सांगितली नाही, तर त्याचा निज अनुभव सुद्धा लाखो लोकांना करविला.

संत दर्शन सिंह जी महाराज या गोष्टीवर जोर देत असत की, अध्यात्म हा एक सकारात्मक तसेच प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा मार्ग आहे. ज्यामध्ये व्यक्ती आपला परिवार, समाज, राष्ट्र यांच्याप्रती आपल्या जबाबदारीला चांगल्या प्रकारे निभवून अध्यात्मिक मार्गात चांगली प्रगती करू शकतो.

संत दर्शन सिंहजी महाराजांना उर्दू आणि फारसीतील आपल्या गजलच्या रचनेमुळे संपूर्ण भारत देशात महान सुफी शायर रूपामध्ये जाणले जाते. त्यांना दिल्ली,पंजाब आणि उत्तर प्रदेशाच्या उर्दू अकादमी कडून चार वेळा पुरस्कृत केले गेले. दयाल पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज 30 मे, 1989 ला महासमाधी मध्ये लीन झाल्यानंतर त्यांचा अध्यात्मिक कार्यभार संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी सांभाळला. त्यांनी दिलेल्या संत मतातील शिकवणुकीला संत राजिन्दर सिंहजी महाराज संपूर्ण विश्वभर प्रसारित करीत आहेत. परिणामी, त्यांना विभिन्न देशांकडून अनेक शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तसेच 5 डॉक्टरेट च्या उपाधीने सन्मानित केले गेले आहे.

सावन कृपाल रुहानी मिशनचे संपूर्ण विश्वभरात साधारण 3000 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्‍वातील 55 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजयनगर, दिल्लीत स्थित आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिका येथे स्थित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या