Thursday, April 25, 2024
Homeधुळेघोणस सापाच्या जोडप्याला जीवदान

घोणस सापाच्या जोडप्याला जीवदान

पिंपळनेर । वार्ताहर Pimpalner

येथील शेतात आढळून आलेल्या घोणस सापांच्या जोडप्याला सर्पमित्रानी सुरक्षितपणे पकडून जिवदान दिले. त्यांना वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.

- Advertisement -

दि.25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्यान येथील अश्विन सोनवणे यांच्या शेतातील घरात दोन मोठे साप दिसून आले. त्यांनी तत्काळ वनरक्षक पवन ढोले यांना घटनेची माहिती दिली. पवन ढोले यांनी पिंपळनेर येथील सर्पमित्र प्रमोद गायकवाड यांना संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच प्रमोद गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अगदी कुशलतेने तब्बल 4-5 फुटांच्या दोन घोणस या अतिविषारी सापांना पकडले.

घोणस हा भारतातील सर्वात विषारी साप आहे. त्याने दंश केल्यास त्याचे विष शरीरातील रक्त गोठवून रक्ताभिसरण क्रिया बंद करून मनुष्याच्या मृत्यू होतो, अशी माहिती सर्पमित्र प्रमोद गायकवाड यांनी दिली. साप हा शेतकर्‍यांच्या मित्र असून कोणीही साप मारु नका व साप दिसल्यास जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्याने केले.

तसेच पिंपळनेर परिसरात कोणताही साप आढळल्यास 8888359767/7558688111या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमोद गायकवाड यांनी केले. घोणस या अतिविषारी सापांना वन धामणदर जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक गुलाब बारीस, वनरक्षक पवन ढोले, वनपाल वाघ, सर्पमित्र प्रमोद गायकवाड, दिनेश बोरसे, अमोल बहिरम उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या