Friday, April 26, 2024
Homeनगरसावतानगरच्या पाणी प्रश्नी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या

सावतानगरच्या पाणी प्रश्नी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर अनाधिकृत जोड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी अंबादास गर्कल यांनी आदोलकांचा पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

सावतानगर उपनगरासाघे स्वतंत्र पाईपलाईन केलेली आहे परंतु या पाईपलाईनवर अनाधिकृत जोड आहेत तसेच हंडिनिमगाव शिवारातील नागरीकांसाठी याच पाईपलाईनला पाईपलाईन जोडल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुख्याधिकारी यांना श्री. जगताप व नागरीकांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महिलांसह आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, सागर शिंदे, रवी रासकर, गणेश जगताप, बाळासाहेब दारकुंडे, दिपक कुरुंदकर, संजय गाडेकर, गणेश कांबळे, किरण गोलवड, सचिन क्षीरसागर, आप्पा घोडेचोर, मयुर वाघ, राजेंद्र जाधव, गणेश हाराळे, कैलास लष्करे, सागर गायकवाड, किशोर मगर, मोहन कळमकर, अरूण आहेर, आलकेश जाधव, महेश यादव, कैलास जाधव, निलेश रासकर, गणेश शिंदे, मुकेश जाधव, भरत पारधे, अजिंक्य टेमक, आकाश सौदागर, प्रकाश बनकर, वैभव यादव उपस्थित होते.

नगरपंचायतच्या चार वर्षांच्या काळात सावतानगर येथे रस्ते, भुमीगत गटारी, स्ट्रीट लाईट आदी सुविधा दिल्या नाहीत. शहरात कामे सुरु असून साधे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही मात्र घरपट्टी पाणीपट्टी वसुल केली जाते.

– नितीन जगताप शहरप्रमुख, शिवसेना नेवासा

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे करोनाच्या काळात आर्थिक भुर्दंड सोसून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तरी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.

– मंगल क्षीरसागर रहिवासी, सावतानगर

- Advertisment -

ताज्या बातम्या