Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान; CM शिंदेंचा राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर जोरदार...

सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान; CM शिंदेंचा राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधींना २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकीही रद्द करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणानंतर राहुल गांधींनी “माफी मागायला मी सावरकर नाही” असं वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी राहुल गांधींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेत भाजपा व शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे..

साईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून निघालेली भाजप- शिवसेनेची सावरकर यात्रेची डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेत सहभागी समुदयाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते…”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

सावरकर हे प्रखर देशभक्त होते, त्यांचे कार्य पोहचवण्यासाठी ही यात्रा आहे. या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग आणि अपमान वारंवार होत आहे त्याची चीड सर्वत्र दिसत असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच एक दिवस तरी तुम्ही सेल्युलर जेलमध्ये राहणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हे सर्व सामान्यांचे सरकार असून कोणताही आमदार, खासदार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी दिला आहे.

लोकप्रियता मिळवण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींच थोतांड; विखे पाटलांनी सुनावले खडेबोल

दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी म्हटलं की, राहुल गांधी यांनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे बनू शकत नाही. अनुराग ठाकूर म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्याबद्दल देश राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकर होऊ शकत नाहीत. याआधी 28 मार्च रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकरांवर टीका न करण्याचा इशारा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या