Wednesday, April 24, 2024
Homeनगरसावळीविहीरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांना अटक

सावळीविहीरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांना अटक

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील लक्ष्मीवाडी रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांनी छापा टाकत रोख रक्कमेसह नऊ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत जुगार अड्डा चालक बबन म्हस्के, रविंद्र साबळे, राहुल राजेंद्र म्हस्के तिघे भागीदार सावळीविहीर येथील डॉ. दोडीया हॉस्पिटल समोर अंडा भुर्जी हातगाडीच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधे तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व खेळवित असल्याचे गुप्त माहितीवरून शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रुपवते यांचेसह पो. ना. गोडे, पो. कॉ. औताडे, पो. कॉ. राऊत यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता अड्डा चालक बबन म्हस्के, रविंद्र साबळे, राहूल राजेंद्र म्हस्के याचे सह दिलीप रामदास सुरंजे, कमलाकर विनायक चाबुकस्वार, बाळू सखाराम धिवर, सचिन एकनाथ घुगे, सुदेश वैजनाथ जानकर, शिवाजी सुर्यभान पवार याना रंगेहात पकडण्यात आले आहे.

यावरून शिर्डी पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली असुन त्यांचेविरोधात मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून वरील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पो. ऊ. नि. रुपवते हे नव्यानेच शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. ते येथे येताच अवैध धंदे बंद करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच आपल्या परिसरात कोठे असे अवैध धंदे सुरू असल्यास शिर्डी पोलिसाशी संपर्क साधावा खबर्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन रुपवते यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या