Friday, April 26, 2024
Homeनगरमूळचे नगरचे सौरभ बोरा बनले तिरूपती देवस्थानचे सदस्य

मूळचे नगरचे सौरभ बोरा बनले तिरूपती देवस्थानचे सदस्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नूतन अध्यक्ष व 28 सदस्यांची घोषणा केली आहे. या नूतन कार्यकारिणीत मूळचे नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

उद्योजक सौरभ बोरा हे तिरुपती बालाजी भगवंताचे नि:स्सीम भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे स्थायिक असून विविध सामाजिक कामात सतत सहभागी असतात. त्यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड झाल्याची बातमी गुरूवारी नगरमध्ये पोहचल्यावर नगरमधील मित्रमंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

शहरात व सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा होत आहे. बोरा यांची तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी निवडी झाल्याने नगरचे नाव पुन्हा देश पातळीवर पोहचले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या