Thursday, April 25, 2024
Homeनगरसत्यजित तांबेंना अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याची खुली ऑफर

सत्यजित तांबेंना अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याची खुली ऑफर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून मोठे उलटफेर होत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकीय भुकंपामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातल्या या सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक गुगली टाकला आहे. भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपला सत्यजित तांबे यांच्यावर डोळा असल्याचं विधान करून अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याची खुली ऑफर देऊन टाकली.

- Advertisement -

सिटिझनविल या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. या पुस्तकाच्या विमोचनाला देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि स्वत: सत्यजीत तांबे उपस्थित होते. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली नजर सत्यजीत तांबे यांच्यावर असल्याचं विधान केलं.

‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात’, असं देवेंद्र फडणवीस म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांनाही हसू आवरलं नाही.

फडणवीसांच्या भाषणानंतर सत्यजीत तांबे यांनीही भाषण केलं, यात त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या लोकांची पारख आहे, अशी सूचक प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या