Saturday, April 27, 2024
Homeक्रीडानाशिकच्या सत्यजित बच्छावची कर्णधारपदी निवड

नाशिकच्या सत्यजित बच्छावची कर्णधारपदी निवड

नाशिक | Nashik

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राचे कर्णधारपद नाशिकच्या (Nashik) क्रिकेटपटूला मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाचा डावखुरा फिरकीपटू आणि मधल्या फळीतील भरवशाचा आक्रमक फलंदाज सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) याची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेकरिता (Syed Mushtaq Ali T20 Tournament) महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे…

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (BCCI)टी- २० सामन्यांची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ११ ते २२ ऑक्टोबर दरम्यान मोहली, चंदिगड येथे खेळविण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजितने सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी केल्याने ही निवड झाली आहे.

सत्यजित बच्छावने २०१८-१९ यावर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता. त्यावेळी महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. तसेच सत्यजितने आतापर्यंतच्या टी-२० च्या कारकिर्दीत ३९ सामन्यातील ३८ डावात एकूण ४८ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

तसेच राष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीमुळे गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या (IPL) लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आयपीएल लिलावात (Auction) २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्‍या खेळाडुंच्या गटात त्याचा समावेश होता. त्याबरोबरच आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जतर्फे संघाच्या शिबिरासाठी त्याची निवड झाली होती.

दरम्यान, सत्यजितच्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदावरील निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना (Nashik District Cricket Association) व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली टी – २० स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ

सत्यजित बच्छाव (कर्णधार) यश नहार, पवन शाह, नौशाद शेख (यष्टीरक्षक) कौशल तांबे, अजीम काझी, विकी ओस्तवाल, मुकेश चौधरी, आशय पालकर, राजवर्धन हंगर्गेकर, दिव्यांग हिंगणेकर, शामशुझमा काझी, मनोज इंगळे, यश क्षीरसागर, रामकृष्ण घोष, सिद्धेश वीर

- Advertisment -

ताज्या बातम्या