Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमायक्रोसॉफ्टची घोडदौड भारतीय व्यक्तीच्या हाती

मायक्रोसॉफ्टची घोडदौड भारतीय व्यक्तीच्या हाती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मायक्रोसॉफ्टने कंपनीच्या अध्यक्षपदी सत्या नाडेला यांची निवड केली आहे. माजी अध्यक्ष जॉन थॉम्पसन यांची प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे…

- Advertisement -

जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. आता त्यांच्याकडून हा पदभार सत्या नाडेला यांच्याकडे देण्यात आला आहे.

कोण आहेत सत्या नाडेला

सत्या नाडेला हे भारतीय वंशाचे आहेत. नाडेला हे २०१४ पासून मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या सीईओ पदाच्या कारकिर्दीत मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर व्यवसायवृद्धी झाली आहे.

१९७५ मध्ये स्थापन झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नवी उर्जा देण्याचे काम नाडेला यांनी केले आहे. २०१४ मध्ये नाडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ झाले. त्यावेळी अॅपल आणि गुगल या त्यांच्या स्पर्धक कंपन्यांनी मोबाइलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती.

त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचे काम नाडेला यांनी केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले. १४ टक्के मनुष्यबळात कपात करून त्यांनी कॉर्पोरेट स्ट्रक्चर सुटसुटीत केले.

नाडेला यांनी फिनलंडमधील नोकिया कंपनीचा मोबाइल विभाग आपल्या कंपनीशी जोडून घेतला. त्यांच्या काळात डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला.

लिंक्डइन, झेनीमॅक्स, नुआन्स कम्युनिकेशन्स यांसारख्या कंपन्या मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या आहेत. नाडेला यांचे व्यवसायाबद्दलच्या सखोल ज्ञानाचा कंपनीला कंपनीला फायदा होईल, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या