Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारजिल्ह्यात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू

जिल्ह्यात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी पूर्णत: संचारबंदी रहाणार असून या कालावधित वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने, पाणी, विद्युत, दूध, गॅस वितरक, वृत्तपत्र सेवेला मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.कोणत्याही नागरिकास योग्य कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध असेल. आदेशात सूट देण्यात आलेल्या आस्थापनांशिवाय इतर आस्थापना बंद रहातील.

शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यान्न दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल.

अपवादात्मक सेवांना सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान सूट देण्यात आली असून त्यासंबंधी हालचाली व सेवा सुरू ठेवण्यास नमूद कालावधीत प्रतिबंध असणार नाही. यासेवांमध्ये कार्यरत चालक, घरेलू कामगार यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या