Friday, April 26, 2024
Homeनगरमहिलेशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुखाची हकालपट्टी करा - सातपुते

महिलेशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुखाची हकालपट्टी करा – सातपुते

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपातील महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची

- Advertisement -

आस्थापना प्रमुख पदावरून हकालपट्टी करून मनपा बिल्डींग आवारातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले, महापालिकेतील आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्याविरुद्ध अनेकदा कर्मचार्‍यांना त्रास देणे, महिलांची छेडछाड करणे विनाकारण त्रास देणे, शरीर सुखाची मागणी करणे याबाबत अनेकदा महिलांनी आणि कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या.

तसेच स्वर्गीय शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी देखील याबाबत तक्रार केली होती. परंतु वरिष्ठ जाणीवपूर्वक या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने काही महिलांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली. त्यातून लहारे यांच्यावर महिला समितीमार्फत चौकशी करण्यात आली. ती चौकशी देखील संशयास्पद आहे.

लहारे हा आस्थापना विभाग प्रमुख असल्याने आणि त्याला उप आयुक्तांचे पाठबळ असल्याने, महिला पुढे येण्यास घाबरत होत्या व आहेत. पण तरी देखील अनेक महिलांनी त्यात जवाब दिले असून तसा अहवाल समितीने आयुक्त यांच्याकडे दिला असून, अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.

महिलांशी गैरवर्तणूक करणार्‍या लहारे यांची आस्थापना प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी व मनपा आवारातून बदली करावी व महिला समितीने दिलेल्या अहवालाची तपासणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या