Friday, April 26, 2024
Homeनाशिकसातपूर प्रभाग सभापती निवडणूक

सातपूर प्रभाग सभापती निवडणूक

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

सातपूर विभागात भाजप व शिवसेना यांनी पूर्ण ताकद लावली होती. तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नसल्यामुळे अखेर मनसेनेच्या 2 जागांवर प्रभाग सभापतीचे भवितव्य अवलंबून आहे.

- Advertisement -

मनपाच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला 9 जागा, शिवसेनेला 8, मनसेनेला 2 आणि रिपाइंला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे अवघ्या 2 जागा मिळालेल्या मनसेनेच्या हातात सभापतीपदाचा रिमोट आला आहे. मागील घटना क्रमानुसार पहिल्या वर्षीचे सभापतीपद भाजपच्या माधुरी बोलकर यांना मिळाले होते.

तर दुसर्‍या वर्षीचे मनसेनेचे योगेश शेवरे यांना तर तिसर्‍या वर्षी मनसेनेने तटस्थ भूमिका घेतल्याने त्याचा फायदा शिवसेनेला झाला होता. शिवसेनेचे संतोष गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली होती. आता मनसेना काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे.

पहिल्या वर्षीच्या प्रभाग निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि शिवसेनेचे पक्षीय बलाबल सारखे झाले होते. त्यामुळे अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली.

प्रभाग सभापतीपदासाठी शिवसेनेकडून मधुकर जाधव, सीमा निगळ तर भाजपकडून रवींद्र धिवरे इच्छुक आहेत. यावर्षी देखील शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचा सभापती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कोविडमुळे प्रभाग सभापतीपदाची निवडणूक लांबली आहे.

केवळ सहा महिन्यांसाठी सभापतीपद असण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे मधुकर जाधव यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे, तर भाजपकडून रवींद्र धिवरे हे इच्छुक आहेत.

सरळसरळ निवडणूक झाल्यास मनसेनेच्या दोन मतांवर सभापतीपद अवलंबून राहणार आहे. म्हणजेच सत्तेचा रिमोट मनसेनेच्या हाती आहे. अद्याप मनसेने भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मनसेनेनेे पहिल्या वर्षी भाजप मदत केली होती. दुसर्‍या वर्षी मनसेनेनेे भाजपची मदत घेतली होती. तिसर्‍या वर्षी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यावर्षी काय भूमिका घेते, याकडे भाजप आणि शिवसेनेचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या