Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसातपूर पोलीस ठाण्याचे रूपडे बदलणार

सातपूर पोलीस ठाण्याचे रूपडे बदलणार

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक महानगरपालिकेची स्थापनेपूर्वीची लोकसंख्या गृहीत धरून पोलीस ठाणे उघडण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. त्यामुळे पोलिस ठाण्याचा परिसरही वाढला. दरम्यान मोठे पोलीस स्टेशन उभारण्याची नागरिकांकडून मागणी होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत आ.सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून पोलीस स्टेशनला साडेचार कोटीचा निधी देण्यात आला असून, लवकरच सातपूर पोलिस स्टेशनला आधुनिक सेवा सुविधांनी युक्त नवीन वास्तू मिळणार असल्याचे आ. हिरे यांनी सांगितले.

सन 1978 सातपूर पोलिस स्टेशन उभारण्यात आले होते. यानंतर कारखाने व घरकुलांच्या वाढलेल्या संख्येमुळे पोलिस स्टेशनची जागा कमी पडायला लागली. यासाठी अखेर सरकारने पोलिस स्टेशनला निधी दिला असून, आता अद्ययावत पोलिस स्टेशनची उभारणी होणार आहे. सातपूरसह पिंपळगाव बहुला, तिरडशेत, वासाळी व अंबड लिंक रोडचा काही भाग सातपूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतो.

यासोबत सातपूर औद्योगिक वसाहतीचा परिसरही या पोलीस ठाण्यांतर्गत आहे. नविन वास्तुमुळे आपल्या पडणार्‍या कार्यालयातील अडचणी दुर होणार आहे. या वास्तुत एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एक पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलिस, महिला कक्ष, ठाणे अमलदार कक्ष व इतर विभाग असतील. तसेच पोलिस कोठडीची सुविधाही यात उभारण्यात येणार आहे. सध्या पोलिस कोठडीची सुविधा नसल्याने अंबड अथवा सरकारवाड्याला आरोपींना घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या