Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसातपूर पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल

सातपूर पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्यावर निर्बंध आहे. मात्र याच नियमांचे उल्लंघन करीत सातपूर परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांने भररस्त्यातच वाढदिवस साजरा करीत जल्लोष केला.

- Advertisement -

हा प्रकार सातपूर पोलिसांच्या निदर्शनास येताच राष्ट्रवादीचा युवा पदाधिकारी कल्पेश रमेश कांडेकर याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत, मात्र राजकीय नेतेमंडळीचे समर्थक असो की सराईत गुन्हेगार, त्यांचे टोळके, युवा पदाधिकार्‍यांकडून स्वत:चे शक्तिप्रदर्शन करीत रस्त्यांवर, चौकाचौकात रात्री बाराला केक कापून जल्लोष करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यात सर्वाधिक प्रकार सिडको, अंबड, सातपूर व पंचवटीत घडत आहे. यावरून पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.

सातपूरच्या श्रमिकनगरातील रस्त्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी कल्पेश रमेश खांडेकर याचा वाढदिवस रस्त्यावर दुचाकी उभी करून त्यावर केक ठेवून साजरा केला. यावेळी विनामास्क तसेच गर्दी जमविल्याचे दिसून आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा कारवाई करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरा करीत यंत्रणेलाच आव्हान दिल्याचे दिसून आले.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सातपूर पोलिसांनी दखल घेत कांडेकर याच्यासह परेश विजय नागपुरे, नीलेश हिरे (सर्व रा. श्रमिकनगर), सतीश सुभाष जाधव, विजय मोकळ (रा.नविन नाशिक), भूषण डोके (रा. डीजीपीनगर, अंबड), अनिल गुंजाळ (रा. नाशिकरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या