एमआयडीसी करणार कामगारांचे लसीकरण

jalgaon-digital
2 Min Read

सातपूर | Satpur

नाशिकमध्ये उद्योगांत काम करणाऱ्या कामगारांच्या लसीकरणासाठी आता एमआयडीसीने पूढाकार घेतला असून, थेट उद्योगाच्या आवारातच कामगारांना लस देण्यासाठी एमआयडीसीच्या स्थानिक कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.

उद्योजकांकडून त्याबाबत माहिती संकल्प करण्यात येत आहे. नियमावलीप्रमाणे तूर्तास ४५ वर्षांवरील कामगारांनाच ही लस उपलब्ध होऊ शकणार आहे.

प्रत्यक्षात औद्योगिक क्षेत्रात हजारो कामगार कार्यरत असून, लसीकरणासाठी या कामगारांना स्वतंत्र वेळ काढता येत नाही, तसेच ते लसीकरण केंद्रावर गेल्यावर अनेक तास प्रतीक्षेत घालवावी लागतात. त्यातून कोरोना संसर्गाची भीतीही वाढत आहे.आज सगळीकडे अंशत: लॉकडाऊन असतानाही कामगार अहोरात्र परिश्रम करीत आहेत. त्यांची संसर्गापासून बचावाची चिंता उद्योजकांना आहे.

उद्योजकांची संघटना असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफेक्चरर्स असोसिएशनने उद्योगांमध्येच लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी आयमाने जिल्हा उद्योग केंद्राकडे केली होती, त्याबाबत आता तो एमआयडीसीला उद्योजकांना त्यांच्याकडील ४५ वर्षावरील कामगारांना लस देण्यासाठी माहिती मागविली आहे.

शंभरपेक्षा अधिक कामगार जर ४५ च्या वयोगटातील असतील त्या उद्योगांच्या आवारातच सरकारकडून लसीकरण केले जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मोठ्या संख्येने कामगार असलेल्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांना घेता येणार आहे.

लघु उद्योगातील लसिकरणासाठी जागा देऊ

आमच्या मागणीला प्रतिसाद देत लसीकरण उद्योगांतच करण्याचा चांगला निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. पण जेथे अल्प संख्येने कामगार काम करतात अशा लघु उद्योगांतील कामगारांनाही लस देण्यासाठी आम्ही सातपूर, अंबड, सिन्नर येथे योग्य जागा उपलब्ध करून देण्यास आमची तयारी तयार आहोत. एमआयडीसीने या मागणीचाही गांभीर्याने विचार करावा.

– वरुण तलवार, (अध्यक्ष, आयमा)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *