Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसातपूर मधील भिम फेस्टीवलचा जोरदार गाजावाजा

सातपूर मधील भिम फेस्टीवलचा जोरदार गाजावाजा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिजामाता मैदान सातपूर कॉलनी येथे भिम फेस्टिवलचा जोरदार गाजावाजा झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

या भिम फेस्टिवल (Bhim Festival) मधील भिमगितांचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती. भिम फेस्टिवल स्वागत समिती व जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. बुद्ध (Buddha) वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल व ‘मी होणार सुपरस्टार’ फेम संतोष जोंधळे यांच्या भिम गीतांचा कार्यक्रम नागरीकांच्या प्रचंड प्रतिसादात उत्साहत पार पडला.

परिसरातील महिला, युवक, युवती, ज्येष्ठ, लहान मुले प्रचंड संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. भिम फेस्टिवलच्या अध्यक्षा कमल महिरे, कार्याध्यक्षा रिता जगताप यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्प देऊन स्वागत केले.

…सरकार पडणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का

यावेळी भिम फेस्टिवल समितीच्या वतीने माजी सभापती सलीम शेख, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णा कटारे, संकल्पित रिपब्लिकन प्रकाश पगारे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, धीरज शेळके, माजी नगरसेवक योगेश शेवरे, गीता जाधव, योगेश गांगुर्डे, आदेश पगारे, शिवाजी काळे, संदेश पगारे, ज्येष्ठ सदस्य जेतवन बुद्ध विहार विजय अहिरे, प्रणिल धनधार, पी.एस.आय अश्विनी उबाळे या प्रमुख मान्यवरांना संविधान (Constitution) प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एम.के.पॅरामाउंट करियर अकॅडमीच्या सेंट्रल पोलीस कॉन्स्टेबल झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भिम फेस्टिवल सातपूर कॉलनी 2023 च्या यशस्वीतेसाठी बिपिन कटारे, प्रशांत जगताप, वैभव महिरे, प्रतीक पगारे, दीपक निळे, प्रशांत धिवरे, भारत भालेराव, राहुल गायकवाड, कुंदन पगारे, सतीश केदारे, कुंदन जगताप, योगेश पानपाटील, अजिंक्य जाधव, निशांत शेट्टी, मंगेश जगताप, अरुण पाटील, अविनाश गायकवाड, उमेश जगताप, बंटी लभडे, प्रफुल कटारे, अतुल गोरे, विकी संसारे, अमित पाटील यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या