Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारकुंडल येथे रविवारी सातपुडा आदिवासी महापंचायत

कुंडल येथे रविवारी सातपुडा आदिवासी महापंचायत

मोलगी Molgi । वार्ताहर-

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (जागतिक पर्यावरण दिना) कुंडल (Kundal) (ता.धडगाव) येथे दि.5 जून रोजी आदिवासी एकता परिषद (Tribal Ekta Parishad) व कुंडल गाव समितीतर्फे सातपुडा आदिवासी महापंचायतीचे (Satpuda Tribal Mahapanchayat) आयोजन करण्यात आले आहे. या पंचायतीत निसर्ग व आदिवासी या दोन्ही घटकांमधील नाते यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आदिवासी जीवन पद्धती(Tribal way of life) व संस्कृतीची निसर्गाशी नाळ जुळते (mbilical cord of culture with nature). निसर्गाशिवाय आदिवासी संस्कृतीची फारशी कल्पनाच करता येत नाही तर निसर्ग वाचविण्याची ताकद केवळ आदिवासी जीवनपद्धतीतच आहे, म्हणून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही महापंचायत (Mahapanchayat) होत आहे. या पंचायतीत परक्या संस्कृतीच्या आघाताने आदिवासी संस्कृतीचा र्‍हास, प्रगत मानवी जीवनमुल्यांना निर्माण झालेला धोका, बर्‍याच वेळा नानाविध नावे ठेवत, हिणवत आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता व स्वाभिमान यावर बोट ठेवण्याची प्रथा, स्थलांतर व स्थलांतरामुळे निर्माण होणार्‍या समस्या, परक्या जातीत आदिवासी मुला-मुलींचे होणारे लग्न (Marriages of tribal boys and girls in foreign castes) व उद्भवणार्‍या समस्या, सातपुड्यातील दहेजची वाढती रक्कम व निर्माण होणारे धोके. या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.

या पंचायतीत आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, आदिवासी विचारवंत तथा चळवळकर्ते सांगल्या वळवी, व्याराचे माजी खा.अमरसिंगभाई चौधरी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, एकता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगर बागुल, डॉ.सुनिल पर्‍हाड (पालघर), राजू पांढरा, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.प.कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.चे गटनेते सी.के.पाडवी, सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी, अ‍ॅड.अभिजित वसावे आदी उपस्थित राहणार आहेत.

महापंचायतीला संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन योगेश पाडवी, रवींद्र पाडवी, गणेश पाडवी, कल्पेश पाडवी, चंद्रसिंग पाडवी, राकेश वळवी, सारपा पाडवी, मांगीलाल पाडवी राकेश पाडवी व विनोद पाडवी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या