Friday, April 26, 2024
Homeजळगाववनव्याने होरपळतोय सातपुडा ; आगीपुढे वनविभाग हतबल

वनव्याने होरपळतोय सातपुडा ; आगीपुढे वनविभाग हतबल

धानोरा ता.चोपडा – वार्ताहर chopada

सातपुड्याच्या (Satpuda mountain) अडावद (Adavad) परिक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वनव्याचा भडका ऊडून जंगल होरपळतोय त्यात करोडोंची वनसंपत्ती (Forest resources) नेस्तनाबूत होत आहे. एवढे होत असतांना वनविभागाग (Forest Department) मात्र या आगीपुठे हतबल ठरत असून होरपळणाऱ्या सातपुड्याला जणू कोणी वालीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisement -

आधुनिक साधनांचा अभाव

अडावद हद्दीत वनवा लागत आहे, तो विझविण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत ‌पण टेकड्यांच्या भाग व कमी मणुष्यबळ व आधुनिक साधनांचा अभाव यामुळे अडचणी येत आहेत. मात्र तरीही वनवा विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

– आनंदा पाटील (आर‌.एफ.ओ.), परिक्षेत्र अधिकारी अडावद

(mp) मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर (Barhanpur) पासून तर महाराष्ट्राच्या (nandurbar) नंदुरबार जिल्ह्या प्रयत्न विस्तार लेला सातपुडा कधीकाळी हिरवळीने नटलेला असायचा. यात अनमोल अशी वनसंपत्ती, खनीज संपती, आयुर्वेदिक वन औषधी, अनमोल जातीचे वृक्ष, प्राणी, पक्षी असा खजीनाच होता.

अडावद परिक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून वनव्याने सातपुडा होरपळतोय आधी पांढरी भागात लागलेला वनवा दोन दिवसांपासून कक्ष क्रमांक १९५ मध्ये येऊन धडकला आहे. मोठ्या प्रमाणावर लागलेला हा वनवा १५ ते २० कि.मी.वरून दिसतोय यात शेकडो पक्षी प्राणी यांचा जिव जाण्याचा धोका तर आहेच‌ मात्र लाखो करोंडोची वनसंपत्तीची राखरांगोळी होत आहे.

वनविभागाचे अवघ्या बोटावर मोजण्याईतके कर्मचारी हा वनवा विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण महाकाय वनव्याच्या रूद्राअवतारापुढे ते हतबल ठरत आहेत. वनांचा नाश होत आहे व हा प्रकार असाच सुरू राहिला तर सातपुडा पर्वत इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या