Friday, April 26, 2024
Homeनगरभाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी सतीश बावके

भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी सतीश बावके

अस्तगाव (वार्ताहर) –

भारतीय जतना युवा मोर्चाच्या राहाता तालुकाध्यक्षपदी साकुरी येथील सतीश चंद्रभान बावके यांची नियुक्ती करण्यात

- Advertisement -

आली.

नुकतेच भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर यांनी सतीश बावके यांना निवडीचे पत्र दिले आहे. सतीश बावके यांच्या निवडीबद्दल काल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा शिर्डीत सत्कार केला. याप्रसंगी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, नितीन कोते, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, अशोक पवार, तसेच नगरसेवक, कार्यकर्त्ये उपस्थित होते.

निवडीनंतर बोलतांना भाजयुमोचे नुतन तालुकाध्यक्ष सतीश बावके म्हणाले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तसेच अन्य मंडळीच्या मार्गदर्शनाने राहाता तालुक्यात भाजयुमोच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांचे संघटन करु, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचार तळागाळात पोहचविण्याचे काम करु, देशाला मोदीजी सारखे प्रभावशाली पंतप्रधान लाभले, याचा आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला अभिमान आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारखे विकासपुरुष या मतदारसंघात, जिल्ह्याला लाभले ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. बावके यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या