Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने चिंचोलीकरांमध्ये समाधान

पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने चिंचोलीकरांमध्ये समाधान

सिन्नर । Sinnar (वार्ताहर)

ग्रामपंचायत सदस्या आदिती रमेश आमले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून चिंचोली परिसरातील वाडी-वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत होती.

अनेक वेळा मागणी करुनही नळांना पाणीच येत नव्हते. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी हेळसांड पाहून ग्रामपंचायत सदस्या आदिती आमले यांनी ग्रामसेवक व सरपंचांना धारेवर धरले. व पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नळांना पाणी सोडले.

मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने वस्त्यांवरील भास्कर उगले, शांताराम गायकवाड, ज्ञानेश्वर सानप, नितीन उगले, रमेश आमले, विलास गिते, योगेश झाडे, कैलास उगले, नीलेश नागरे, सुभाष आमले, अनिल लांडगे, अक्षय सानप यांच्यासह रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या