Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसनपाचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर

सनपाचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर

सटाणा । प्रतिनिधी Satana

शहरातील विकासकामांसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करतांनाच जनतेवर कोणतीही करवाढ न लादता नगर परिषदेचा 87 कोटी 45 लक्ष रुपयांचा तसेच 1 लक्ष 31 हजार रुपये शिल्लक असलेला अर्थसंकल्प शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी दिली.

- Advertisement -

नगर परिषदेच्या अर्थसंकल्पासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना नगराध्यक्ष मोरे यांनी रस्ता अनुदानातुन नगर परिषद क्षेत्रातील नविन वसाहतीतील रस्ते कॉक्रीटीकरण व आवश्यक असल्यास डांबरीकरण करण्यासाठी तसेच खड्डे पडलेले रस्ते दुरुस्ती कामासाठी 1 कोटी रुपये

विशेष रस्ता अनुदानांतर्गत 5 कोटी रु., खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतुन नगर परिषद रस्ते, सभामंडप, खुल्या जागांना कंपाऊड, उद्यान सुशोभीकरण, पाणी वितरण व्यवस्था, विंधनविहीरी आदी कामांसाठी प्रकरणपरत्वे जिल्हा नियोजन समितीकडून नगरोत्थान योजनेतील मंजूरीस आधिन राहुन 1 कोटी रु., दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत शौचालय बांधणे, पाईपलाईन टाकणे, एलईडी पथदिपांची व्यवस्था करणे, रस्ते इत्यादी कामांसाठी 1 कोटी रु.,

वैशिष्ट्यपुर्ण विकास कामांतर्गत सटाणा शहर हद्दीतील विविध विकासकामासाठी 2 कोटी 30 लाख रुपये, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत 10 कोटी रु., अल्पसंख्यांक विकास योजनांसाठी अनुदाना अंतर्गत इदगाह परिसर, दफन भुमी व अल्पसंख्यांक परिसरात विकास कामे करणेसाठी रु. 50 लक्ष, नगरोत्थान अभियान अंतर्गत सटाणा शहर हद्दीतील प्रभागांमध्ये विकासकामे करणेकामी 5 कोटी तसेच नगरोत्थान अभियान योजनेत नगरपरिषद हिस्सा 50 लाख, तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत यात्रा परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी 50 लाख,

नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत शहर विकास आराखड्यातील आरक्षणे विकसीत करणेसाठी 40 लक्ष, म्हाडा घरकुल योजने अंतर्गत शासनाकडील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबे, अनुसुचित जाती, जमाती व इतर घटकांसाठी शासन निर्देशानुसार घरे बांधुन देण्याकरिता 55 लक्ष, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सटाणा शहर हागणदारी मुक्त करण्याबाबतचे उद्दीष्ट पुर्ण झाले असून, आगामी अर्थसंकल्पीय वर्षात सार्वजनिक शौचालयांचा वापर पुर्णपणे कमी करुन वैयक्तीक शौचालय बांधुन देण्यासाठी तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध स्वच्छता विषयक कार्यक्रमांसाठी 2 कोटी, केंद्रीय 14 व्या व 15 वा वित्त आयोगा अंतर्गत आगामी काळात प्राप्त होणार्‍या अनुदानातुन स्वच्छ भारत अभियानासाठी नगर परिषदेचा हिस्सा, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत प्रक्रीया व कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 कोटी, सेवा निवृत्ती वेतन धारकांची देणी देण्याकरिता 1 कोटी, विविध भुसंपादन प्रस्तावाकामी 12 कोटी, दुर्बल घटकासाठी,

महिला व बालविकास करीता तसेच दिव्यांग कल्याणासाठी प्रत्येकी 5 % निधी, स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सुट साठी अंदाजित 2.5 लक्ष, सटाणा नगरपरिषद कार्यालय इमारतीवर सौर प्रकल्प उभारुन संपुर्ण कार्यालयाची विद्युत व्यवस्था सौर उर्जेवर करण्याकरिता 25 लाख, शहरातील गाळकचरा उचलुन संकलन करण्याकरिता 14 वा वित्त आयोगामध्ये 1 कोटी 47 लाख,

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरीता 1 कोटी 50 लक्ष, तातडीच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विंधन विहीरी घेण्यासाठी 13 लक्ष भुयारी गटार योजने अंतर्गत मलनिस्सारण केंद्रासाठी जागा संपादित करण्याकरिता 5 कोटी, सटाणा शहरातील पुनंद पाणी पुरवठा योजनेकरिता 10 कोटी अशा स्वरुपात सर्व विकासकामासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे मोरे यांनी यावेळी जाहीर केले. पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष दिपक पाकळे, गटनेते राकेश खैरनार, नितीन सोनवणे, बाळू बागुल आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या