सटाणा मर्चंटची वार्षिक सभा Online

jalgaon-digital
2 Min Read

सटाणा । Satana (ता. प्र.)

सटाणा मर्चंटस् को. ऑप. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने चेअरमन कैलास येवला यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सभेत बँकेच्या पोटनियम दुरुस्तीमध्ये रिझर्व बँकेच्या सुचनेनुसार 100 कोटी ठेवीनंतर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियम मंजुरी देण्यात आली. तसेच 100 कोटी ठेवी ओलांडलेल्या संचालक मंडळाच्या संख्येत वाढ करण्याच्या पोटनियमास मंजुरी देण्यात आली.

बँकेचे सभासद अशोक गुळेचा यांनी आयत्यावेळी विषयात सभासदांसाठी विमा योजना राबविण्याची मागणी केली. राजकुमार सोनी यांनी सभासद खातेदारांना कोविडमुळे व्याजदारात सवलत देण्याची मागणी केली.

बँकेचे ज्येष्ठ संचालक सुमतीलाल बुरड यांनी सुमारे 11 हजार किमी अंतर असलेल्या परदेशातील कॅनडा येथून सभेस उपस्थित राहून मौलिक सूचना करून नेट बँकींग सुरू करण्याबाबत सूचना केली. किशोर कदम यांनी न्यायप्रविष्ट विषयांवर सभासदांनी न्यायालयात जावे, सभादांना वेठीस धरू नये असे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक काकाजी सोनवणे, महेश देवरे, अरविंद सोनवणे, महेंद्र शर्मा, रमेश देसले, सुरेश बागड, धनाकांत येवला, रूपाली पंडीत, कल्पना साळवे, दिलीप मेतकर, श्रीधर कोठावदे, अशोक निकम, डॉ. विठ्ठल येवलकर, ज्योती कोठावदे, कमलकिशोर भांगडीया, किरण मोरे, रूपाली जाधव, डॉ. निनाद येवलकर, पल्लवी कोठावदे, आदीसह सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ऑनलाईन सभेस बँकेच्या व्हा. चेअरमन कल्पना येवला, संचालिका रूपाली कोठावदे, संचालक जयवंत येवला, दिलीप चव्हाण, पंकज ततार, जगदिश मुंडावरे, प्रवीण बागड, शरद सोनवणे, प्रकाश सोनग्रा, तुषार खैरनार, आदी उपस्थित होते.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी इतिवृत्त वाचन केले. प्रस्ताविक संचालक दिलीप चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन कल्पना येवला यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *