Thursday, April 25, 2024
Homeनगरकट्टर ससाणे समर्थकांची पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी

कट्टर ससाणे समर्थकांची पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक अवघी आठ-नऊ महिन्यावर येऊन ठेपली असताना सत्ताधारी गटाने विकास कामांचा धडाका सुरु

- Advertisement -

करून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असताना विरोधी ससाणे गटात सामसुम दिसत होती. मात्र परवा माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्षांसह आजी-माजी नगरसेवकांनी एका वस्तीवर स्नेहभोजनाचे निमित्त करून पालिकेच्या मोर्चेबांधणीचा श्रीगणेशा केला.

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळूनही ससाणे गटात पडलेल्या फुटीमुळे विरोधी बाकावर बसण्याची वेळ ससाणे समर्थकांवर आली. केवळ गटनेता कोण या वादामुळे ससाणे गटाला फुटीची बाधा झाली होती.

गेली चार वर्षे पालिकेत विषय समित्यांच्या निवडी होऊ न शकल्याने सत्ताधारी गटात सहभागी होऊनही अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत झाल्याने नगरसेवकांत नाराजी निर्माण झाली. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी गटाने गेल्या चार वर्षांत रेंगाळलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागात विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे.

दुसरीकडे विरोधी ससाणे गटात मात्र सामसूम दिसत असताना दोन दिवसांपूर्वी ससाणे यांना मानणार्‍या दोन माजी नगराध्यक्षासह काही आजी-माजी नगरसेवकांनी एका वस्तीवर स्नेहभोजनाचे निमित्त करून आगामी पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणीचा श्रीगणेशा केला.

गेल्या निवडणूकीनंतर काय घडले? कसे घडले? कोणामुळे घडले? याचा विचार न करता आगामी निवडणुकीत व्यक्तीगत मतभेद बाजुला ठेऊन पालिकेची सत्ता कशी ताब्यात येईल त्यादृष्टीने काम करण्याबाबत तसेच दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या विविध विषयावर या बैठकीत विचारमंथन झाले. त्यामुळे ही बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या