Sunday, May 5, 2024
Homeनगरबेफिकीरी टाळा...लसीकरण करून घ्या!

बेफिकीरी टाळा…लसीकरण करून घ्या!

भारतात कोविडचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी आढळला. तेव्हापासून आजपर्यंत भारतात 14.8 दक्षलक्ष रुग्ण आढळून आले आहेत, तर 1 लाख 77 हजार रुग्णांचा मृत्युमुखी पडले आहेत. आज करोनाच्या दुसर्‍या लाटेत दिवसाला 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर महाष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा थोडे कमी असले तरी हा आजार झपाट्याने वाढत आहे. या स्थितीत सर्वांनी काळजी घेणे, नियम पाळणे गरजेचे आहे. विशेषत: तरूणांनी करोनाबाबतही बेफिकीरी टाळली पाहिजे, असे आवाहन अहमदनगर येथील मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक, सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ.सतीश सोनवणे यांनी केले.

सार्वमतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या चर्चेत त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे-

- Advertisement -

अमेरिकेत कोविडचे लसीकरण हे 55 टक्के, इंग्लंडमध्ये 66 टक्के, युएसएमध्ये 90 टक्के, इसराईलमध्ये 140 टक्के आहे.(म्हणजे इथे दुसरा डोस देखील 40 टक्के लोकांना मिळालेला आहे. दुसरीकडे भारतात करोना लसीचा दुसरा डोस फक्त 0.5 टक्के लोकांना मिळालेला आहे). जगभरात सध्या करोनावर 12 लस आहेत. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॉक्सिन या दोन लस आहेत. अमेरिकेत सध्या फायझर, मॉडेरना, जॉनसन अण्ड जॉनसन या लस आहेत. तर रशियात स्पुटीन के ही लस आहे. प्रत्येक लसची ऑक्शन वेगळी आहे. लसीमुळे शरिरात प्रतिकार शक्ती तयार होते. लसीकरण झाले म्हणजे तुम्हला कोविड होणार नाही, असे बिल्कूल नाही. लस घेणार्याची प्रतिकार शक्ती ही दुसर्या डोसनंतर 2 ते 3 आठवड्यांनी येते. त्यानंतरही जरी कोविड झाला तर त्याची व्याप्ती कमी असते आणि मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. यासाठी लसीकरण हे हवेच. ज्यांना कोविड आजार होवून गेला, त्यांचेही लसीकरण आवश्यक आहे.

जगात जोपर्यंत 70 टक्के लोकांचे लसीकरण होणार नाही. तोपर्यंत हर्ड युमिनीटी (प्रतिकार शक्ती) येणार नाही. भारतात संथ गतीने लसीकरण सुरू राहिले तर लसीकरण पूर्ण होण्यास 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. यामुळे आपल्या दोन लसींसोबत अन्य लसींना सुरूवातीलाच मान्यता देणे आवश्यक होते. आता लस उत्पादन वाढविणे, सर्व विदेशी लसींना मान्यता देणे, सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये लस उपलब्ध करणे आणि घरोघरी लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढविणे हाच करोना तांडवाला उत्तर आहे, असे माझे परखड मत आहे. पण हे लसीकरण करतांना पूर्ण जगाचे अगदी आफ्रिकन देशाचे लसीकरण आवश्यक आहे. दुदैवाने आज काही देशांनी लस पाहिलेली देखील नाही. जगातील 70 टक्के लोकांमध्ये प्रतिकार शक्ती तयार होत नाही, तोपर्यंत करोनाचे समुळ उच्चाटन अशक्य आहे. म्हणून किमान 3 ते 4 वर्षे करोनाबरोबर राहायाला शिकले पाहीजे. यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारिरीक अंतराचे बंधन पाळणे गरजेचे आहे.

भारतातून किंवा राज्यातून करोना कधी गेलाच नव्हता. मात्र, आम्ही करोना गेला असे समजून निर्बंध उठले. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमांना तुफान गर्दी होवू लागली. कोविडला निमंत्रण देणारे वर्तन सुरू ठेवले. (मास्क वापरने, सॉनिटायझर लावणे, आंतर ठेवणे हे सर्व विसरून गेलो). युरोपात करोनाची दुसरी लाट, तिसरी लाट आली आणि आम्ही स्वत:च्या पाठीवर थाप देत बसलो की आमची प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यात आता करोना विषाणूचे म्युटेशन, स्ट्रेन यातही फरक आहे. युके स्ट्रेन, दक्षिण आफ्रिका स्ट्रेन, ब्राझिल स्ट्रेन आणि आपल्या देशात व राज्यात ज्याने थैमान घालत आहे तो डबल म्युटेशन स्ट्रेन यांचा सामवेश आहे.करोनाची नवी लाट अधिक झपाट्याने पसरणारी आहे. हे नवीन म्युटेशन स्ट्रेन हा आरटीपीसीआर चाचणीमध्ये सापडत नाही. लहान मुलांना देखील झपाट्याने प्रभावीत करतो. अलिकडच्या काळात लहान मुलांना देखील करोनाची लागण झाल्यावर व्हेेंटीलेटरची गरज लागत आहे. पूर्वी खोकला, ताप, थंडी, घशात त्रास, तोंडातील चव जाणे ही करोनाची लक्षणे होती. आता त्याच्या पलिकडे डोके दुखणे, डोळे लाल होणे, पोट दुखणे, अस्वस्थपणा, जुलाब होणे हे लक्षणे देखील प्रामुख्याने दिसत आहेत.

सध्या करोना आजारावर निश्चित असे औषध नाही. परंतू आज ऑक्सिजन, स्टेरॉईड्स, रक्त पातळ करणारी औषधे आणि रेमडेसिवीर यांचा उपयोग महत्वाचा आहे. त्यातही रेमडेसिवीरचा उपयोग हा सर्रास करता येत नाही. काही ठरावीक रुग्णांमध्ये वा कालावधीत रेमडेसिवीरचा फायदा होतो.

तरूणांनी या स्थितीत बेफिकीरी टाळली पाहिजे. अलिकडे तरूण आणि लहान वयातही करोनाची बाधा होत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. घारतील ज्येष्ठ माणसे तर घर सोडणे टाळत आहेत. मात्र जे अर्थाजन किंवा कामासाठी बाहेर पडतात, त्यांनी सावध राहिले पाहिजे. नियम पाळले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या