Thursday, April 25, 2024
Homeजळगावसर्वेद्य शिक्षण संस्थेची निवडणूक लांबणार ?

सर्वेद्य शिक्षण संस्थेची निवडणूक लांबणार ?

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील सर्वोदय शिक्षण को-ऑप समाज लि. उंबरखेड या शिक्षण संस्थेच्या दि २१ रोजी होवू घातलेली निवडणूक लांबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलकडून उभे असलेले उमेदवार सुपडू मांगू महाज(७२)(सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांचा आज कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे नियमाप्रमाणे हि निवडणूक लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक पुढे ढकण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांनी त्यासंदर्भातील अर्ज शासनाकडे दिला आहे.

तसेच कोरोनामुळे एक उमेदवारांचा मृत्यू झाल्याने परिवर्तन पॅनलकडून उभे असलेले उमेदवार व मतदारांमध्ये सभ्रम व घबराड निर्माण झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ते प्रचारासाठी उमेदवारांसोबत फिरत होते. त्यामुळे ही निवडणूक ८ ते १५ दिवसांसाठी लांबवणीवर जावू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या