Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन दिवस नाशकात

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन दिवस नाशकात

नाशिक। प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दि. 20 व 21 मे रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. यंंदाचा दौरा केवळ संंघ कार्यकत्यार्ंंच्या ब्रेनवॉशसाठी असून सरसंंघचालक काय सांंगतात, याकडे सवार्ंंचे लक्ष्य लागले आहे.

- Advertisement -

पश्चिम क्षेत्र द्वितीय (विशेष) वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आरंभ भोसला मिलिटरी प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात गेल्या दि.15 मेपासून झाला आहे. या प्रशिक्षण वर्गात सौराष्ट्र, गुजराथ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, देवगिरी व विदर्भ या प्रांतातून एकूण 476 स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या विविध राज्यातील वर्गात शिक्षार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी संघाचे अखिल भारतीय अधिकारी तसेच क्षेत्र व प्रांत स्तरावरील कार्यकर्ते प्रवास करीत असतात. त्याअंतर्गत नाशिक येथील विशेष द्वितीय वर्षाच्या वर्गात सरसंघचालक मोहन भागवत हे स्वतः 20 व 21 मे रोजी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे आगमन होईल. ते भोसलाच्या विश्रामगृहातच थांबतील.

इतर वेळी जशा भेटीगाठी घेत तसे यावेळी ते कोणालाही भेटणार नाहीत. या दोन दिवसात सरसंघचालक शिक्षाथ्यार्ंंशी चर्चा व संवाद साधतील. तसेच सर्वांना मार्गदर्शन करतील. नाशिकच्या या पावणे पाचशे स्वयंंसेवकांंना थेट सरसंघचालंकांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या