२६ ग्रा.पं.साठी सरपंच निवड १५ व १७ रोजी

भुसावळ – प्रतिनिधी) Bhusawal

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार १५ रोजी १४ तर १७ रोजी १२ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडले जाणार असून त्याबाबत आदेश तहसीलदार दीपक धीवरे यांनी काढले आहेत.

पीठासीन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार सभा

पीठासीन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत संबंधित ग्रामपंचायतींमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशन, दुपारी २ वाजता छाननी, माघारीसाठी मुदत देऊन सरपंच निवडीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ग्रा.पं. सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. काही गावांमध्ये एकच पात्र उमेदवार असल्याने तेथील निवडीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. निवडीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. काही गावांमध्ये एकच पात्र उमेदवार असल्याने तेथील निवडीची औपचारिकता पूर्ण केली जाईल.

१५ रोजी तालुक्यातील कुर्हे पानाचे (नामाप्र), साकेगाव (अनु. जमाती महिला), पिंप्रीसेकम-निंभोरा (नामाप्र महिला), खडके (सर्वसाधारण), साकरी (अनु. जाती), किन्ही (सर्वसाधारण महिला), मन्यारखेडा (अनु.जाती), पिंपळगाव बुदूक (अनु. जमाती), टहाकळी (सर्वसाधारण महिला), जाडगाव (अनु.जाती), आचेगाव (सर्वसाधारण महिला), सुसरी (नामाप्र महिला), वांजोळे (नामाप्र महिला), खंडाळे (सर्वसाधारण) यांची निवड होणार आहे.

१७ रोजी तालुक्यातील कंडारी (अनु.जमाती), दर्यापूर (सर्वसाधारण महिला), फेकरी (नामाप्र), मांडवेदिगर – भिलमळी (अनु. जमाती), काहुरखेडा (नामाप्र महिला), जोगलखेडा (नामाप्र महिला), कठोरे बु. (अनु. जाती), शिंदी (अनु. जाती), बोहर्डी खुर्द, बुद्रूूक (सर्वसाधारण), बेलव्हाय (सर्वसाधारण), हतनूर (सर्व साधारण महिला), कठोरे खुर्द (नामाप्र) यांची निवड होणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *