Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजलरंगांमध्ये साकारला पेशवेकालीन सरकार वाडा

जलरंगांमध्ये साकारला पेशवेकालीन सरकार वाडा

नाशिक | प्रतिनिधी ( Nashik )

जागतिक संग्रहालय दिवस सप्ताह निमित्त अभिरक्षक प्रादेशिक वस्तु संग्रहालय, महाराष्ट्र शासन आणि नाशिक सराफ असोसिएशन, नाशिक यांच्या तर्फे नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश भिमराज सावंत (Painter Rajesh Bhimraj ) यांचे जलरंग चित्र प्रत्यक्षिक (Watercolor picture demonstration ) १९ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिकचा ऐतिहासिक महत्त्व असलेले पेशवेकालीन सरकार वाडा ( Sarkarwada ) येथील विलोभनीय, सौंदर्यपूर्ण वास्तूत सदर प्रात्यक्षिक साकारले गेले चित्रकार राजेश सावंत यांनी सरकार वाड्यातील वाड्यांमधील अलंकारिक लाकडाचे कोरीव काम असलेल्या मराठमोळा वाड्यातील चौक परिसर अत्यंत कलात्मक पद्धतीने रसिकांसमोर जल रंगांमध्ये आपल्या जादुई कुंचल्यातून साकारला.

त्यांच्या जगप्रसिद्ध चित्रशैलीचा अविष्कार त्यांच्या प्रत्येक कुंचल्याच्या फटकाऱ्यातून व रंगलेपना जाणवत होता, लाकडी महिरपरपिंच्या समुहा मधून येणारा संधिप्रकाश अत्यंत स्वर्गीय पद्धतीने त्यांनी चित्रित केला, पूर्वीच्या काळी चौकांमध्ये छोटा दगडी तलाव ज्या पद्धतीने पेशवे काळात पाण्याने भरलेला असताना जसा दिसत असावा तसाच पूर्वीसारखा चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या कल्पनेने तंतोतंत यशस्वीपणे साकारला .

उष्ण व शीत रंगसंगतीचा जलरंगात सारख्या काहीसा क्लिष्ठ माध्यमात अत्यंत हुकमतिने रंगलेपणामुळे सदर निसर्गचित्रांची कलात्मक उंची अधिकच प्राप्त झालेली दिसली, सदर निसर्ग चित्रातील पारदर्शकता, नितळपणा , ओघावतेपन रसिकांशी संवाद साधत होती, संग्रहालय दिनानिमित्त सदर चित्र हे अत्यंत समर्पक असे ठरले,या चित्रातून सरकार वाड्याचे अनोख्या पद्धतीने कलात्मक पद्धतीने डॉक्युमेंटेशन करण्यात आले.

आज पर्यंत चित्रकार राजेश सावंत यांचे देशासह विदेशातही अनेक ठिकाणी मान्यवर कला संस्थान कडून अनेक ऑन द स्पॉट प्रात्यक्षिके, कार्यशाळा व चित्र प्रदर्शने अत्यंत यशस्वीपणे प्रदर्शित करण्यात आली आहेत आज पावेतो विविध देशांची त्यांना त्यांच्या चित्रकारिते बद्दल अनेक मान्यवर कला संस्थांची २१ अंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झालेली आहेत, जागतिक पातळीवर आपल्या देशाचे कलात्मक प्रतिनिधित्व अनेक वेळा ते करत आली असून आपल्या देशाची कला संस्कृती व परंपरा यांचे दर्शन आपल्या रंग कुंचल्यातून त्यांनी अनेक वेळा जगासमोर सादर केले आहे.

सदर निसर्गचित्राच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी अभिरक्षक प्रादेशिक वस्तू संग्रहालय प्रमुख आरती आळे, सोज्वल साळी, संग्रहालयाचे अनेक कर्मचारी, नाशिकचे जेष्ठ चित्रकार भी,. रा. सावंत तसेच, नाट्यकर्मी राजेन्द्र तिडके या सारखे अनेक मान्यवर व रसिक, कला विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या