सरकारसाहेब रावल

jalgaon-digital
5 Min Read

दिनेश ठाकरे

दोंडाईचा Dondaicha

माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कसे जगावे याची मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सरकारसाहेब रावल, कितीही मोठया परीवारात जन्माला आले तरी देखील मेहनतीशिवाय प्रगती होवू शकत नाही हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

म्हणूनच आज त्यांना कृषीमित्र, उदयोगपती, विकासरत्न, दानशूर व्यक्तीमत्त्व, शिक्षणमहर्षी, गरींबांचे कैवारी, अशा कितीतरी उपाध्या जनतेकडून मिळत असतात, कुणाच्या ऑपरेशनसाठी तर कुणाला दृष्टी मिळावी, कुणाला शिक्षणासाठी तर कुठे मंदिरासाठी कुठेच सरकारसाहेबांनी मदत करतांना आपला हात आखडता घेतला नाही म्हणूनच आज सरकारसाहेब रावल पच्चात्तरी मध्ये देखील तरूणाला लाजवतील असे काम करतात, त्यांची सकाळ पहाटे 5 वाजता होते यावरून त्यांच्या कामाची पध्दत आपल्या लक्षात येईल, सकाळी 10 पर्यंत शेती, नंतर उदयोग, सायंकाळी पुन्हा शेती असा त्यांचा दिनक्रम असतो आज एवढेच नव्हे तर रावल परीवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी ज्या वेदना सोसल्या आहेत त्या सर्वश्रृत आहेत म्हणूनच आज कितीही संकटे आली तरी न खेचणारे सरकारसाहेबांना आयुष्यात जे पाहिते तसे सौभाग्य मिळाले पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा अशी एक म्हण आहे सरकारसाहेबांच्या बाबतीत खरी झाली आहे, आज सरकारसाहेबांचे पुत्र माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सातासमुद्रापार देखील त्यांचे नांव कमविले हीच सरकारसाहेबांची खरी कमाई आहे.

स्वातंत्र मिळाल्यानंतर बी.एस्सी ग्रीकल्चरची पदवी संपादन केल्यावर बड्या पगाराची शासकीय नोकरी न करता शेतकरी मित्र बनण्याचे सरकारसाहेबांनी पसंत केले. राजघराण्यात जन्माला येवून त्यांनी पारंपारीक पध्दतीची शेती झुगारून आधुनिक शेती परिसरात शेतकर्‍यांमध्ये सजविली. यांत्रिक शेती कशी फायद्याची हे समजावून सांगितली. त्याकरीता स्वत: एक ट्रॅक्टर बँकेच्या कर्जातून घेतले.

स्वत: शेती तर केलीच परंतू शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. कृतीतून समाज प्रबोधनाचे कार्य सरकारसाहेब रावल यांनी केले. शेतकरी पारंपारीक बियाणांत अडकला होता. हायब्रीड बियाणे, रासायनिक खते यांचा वापर कसा करावा? हे देखील कृतीतून समजावून सांगितले हे एक मोठे दिव्य त्यांना करावे लागले. यासाठी त्यांनी धुळे जिल्ह्यातील पहिले कृषी सेवा केंद्र सुरू केले होते.

शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती याचा ध्यास दादासाहेब रावल यांनी घेतला होता. शेतकर्‍यांना अर्थ पुरवठा करणारी बँक तर कृषीपूरक उद्योगपर्यंत त्यांचा प्रवास आहे तो आपल्याला ज्ञात आहेच. पुढे दादासाहेबांनी शेतकर्‍याच्या शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हणजे स्टार्च फॅक्टरी सुरू केली. त्यात सरकारसाहेब रावल यांनी फॅक्टरीच्या भरभराटीसाठी अहोरात्र कष्ट उपसले. पिता-पुत्रांच्या या त्रिकुटाने स्टार्च फॅक्टरीचा लौकीक देशासह परदेशातही पोहचविला. जगाच्या नकाशात दोंडाईचा शहराला स्थान मिळवून दिले.

शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून विज्ञान व तंत्र शिक्षण समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहचविलेलं आहे.

1984 मध्ये शिंदखेडा तालुक्यातील पहिलं विज्ञान महाविद्यालय, किमान कौशल्य आधारीत व्यवसाय शिक्षणासह आय.टी.आय. हे तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे दोंडाईचासह परिसरातील ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. पुढे त्यात सातत्याने वाढ होत बदलत्या काळानुसार शिक्षण प्रक्रियेत बदल घडवित आज राज्य पातळीवर स्वत:चा ठसा उमटविणारे कृषी महाविद्यालय दिमाखाने यशस्वी घोडदौड करीत आहे. या कृषी महाविद्यालयाने देशाला आय एस आय अधिकारी दिलेला आहे. या उल्लेख करायला हवा. यतिश विजयराव देशमुख हे त्या विद्यार्थ्यांचे नाव! शिवाय विविध राष्ट्रीयकृत बँक अधिकारी पदावर तर डझनावरी विद्यार्थी घडविले.

सांस्कृतिक कला क्षेत्रात ही आपल्या कल्पक बुध्दीमत्तेनुसार सरकारसाहेब रावल यांनी मैलाचा दगड उभा केलेला आहे.

महाराष्ट्राला सुमारे साडेसातशे वर्षांची वारकरी परंपरा लाभलेली आहे. समाज संघटनाचं, जातीय भेद नष्ट करीत एकतेचा संदेश देण्याचं कार्य वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांपासून तर बाबा महाराज सातारकर तर प्रत्येक गावातील भजनी मंडळांपर्यंत हा दैदिप्यमान प्रवास येऊन पोहोचतो. यातली अडचण म्हणजे भजनी मंडळांकडे साहित्य नसल्याने ही मंडहे बंद पडलेली होती. भजन परंपरेला ऊर्जित अवस्था देण्यासाठी सरकारसाहेब रावल यांनी ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करून भजन स्पर्धा घेतल्या. सहभागी भजनी मंडळाला भजनाचे साहित्य दिल्यामुळे गावा-गावात रात्री मजय जय रामकृष्ण हरीफ ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामाचे स्वर गुंजत आहेत. हे एक मोठं सांस्कृतिक कार्य साहेबांनी केलेले आहे.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून मजय लोकोत्सवफ हा स्पर्धात्त्मक उपक्रम राबवून लाखोंची बक्षिसे प्रोत्साहनपर देऊन सांस्कृतिक कलात्मक मूल्यांचे जतन मा. सरकारसाहेब रावल करीत आहे. माणसापेक्षा या जगात मोठं कुणीही नाही आणि कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ धर्म दुसरा नाही, असे विचार सरकारसाहेब रावल पटवून देतात. कारूण्य हा त्यांचा स्थायीभाव आहे. स्वत:च्या गाडीने प्रवास करत असतांना रस्त्यावरचा वाटसरूला गाडीत बसवून घेतात.

अडलेल्या माणसांचे प्रश्न स्वत: लक्ष घालून सोडवित असतात. कृषी, उद्योग, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून समाजात किमया करणारे किमयागार चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व सरकारसाहेब रावल यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

मो. 93254 04764

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *