Wednesday, April 24, 2024
Homeनगरऊसावर सरकोस्पोरा लॉन्जिपस रोगाचा प्रादुर्भाव !

ऊसावर सरकोस्पोरा लॉन्जिपस रोगाचा प्रादुर्भाव !

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

सद्यःस्थितीत सात ते दहा महिन्याच्या ऊस पिकाचे पानावर सरकोस्पोरा लॉन्जिपस या बुरशीजन्य लाल तपकरी ठिपके रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

- Advertisement -

या रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण साधारणतः ३० ते ४० टक्के दिसून येत असल्याने मुख्यतः नेवासा, शेवगाव, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ऊसावर आलेला हा रोग सरकोस्पोरा लॉन्जिपस या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. रोगाचा प्रादुर्भाव हा रोपांपेक्षा 7 ते 10 महिने वयाच्या पिकावर होतो.जुन्या पानाच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्‍यांभोवती पिवळसर वलय दिसते.

प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्‍यांमधील पेशी मरतात आणि संपूर्ण पान वळून जाते. प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. ऊसातील साखर उतारा व वजन घटते.पर्यायाने उत्पादनात घट येण्याची श्यक्याता वाढते.रोगाचा प्रसार 75 ते 80 टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदूंमार्फत होतो. को-86032 व एमएस 10001 या ऊस जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव इतर वाणांच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतो.

उपाययोजना…

लहान ऊसाची आंतरमशागत वेळेत करून रासायनिक खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना सिलिकॉन सारख्या घटकाचा वापर अवश्य करावा. त्यासाठी प्रतिहेक्‍टरी 1.5 टन बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणाऱ्या जीवाणूंचे खत 2.5 लिटर या प्रमाणात वापर करावा. मोठ्या ऊसात एकरी 9 किलो सिलिकॉनयुक्त खतांच्या वापराने उसातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र तशी विद्यापीठाची शिफारस नाही.

रासायनिक नियंत्रण

फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोपिकोनॅझोल 1 मि.लि किंवा मॅन्कोझेब 3 ग्रॅम थायोफनेट मिथाइल या बुरशीनाशकाचा 500 ग्रॅम प्रति प्रति एकर प्रमाणे ठिबक सिंचनद्वारे जमनितून वापर करावा.

माणिक लाखे

विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या