Friday, April 26, 2024
Homeनंदुरबार8 डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरुवात

8 डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरुवात

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-

येथील श्री.एकमुखी दत्त यात्रेला (Ekmukhi Dutt Yatra) अवघे दोन दिवस उरले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठया उत्साहात यात्रा होत आहे. यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची (Devotees) गैरसोय होता कामा नये. तसेच सेवा सुविधांमध्ये (Service facilities) हयगय करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी (Collector) मनिषा खत्री यांनी दिल्या.

- Advertisement -

चोपड्याची दिप्क्षीका माळी इंडिगो एअरवेज कंपनीची एअरहोस्टेज

8 डिसेंबर पासून सारंगखेडा येथील यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या यात्रेत मोठया प्रमाणावर देवदर्शनासह यात्रेकरु, अश्व विक्रेते, चेतक फेस्टिव्हलला येतात.

या यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीबाबत आढावा व पाहणी करण्यात आली. यावेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, तहसीलदार डॉ.मिलिंद कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, मुख्य अभियंता अनिल बोरसे, उप कार्यकारी अभियंता भुषण जगताप, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ, कनिष्ठ अभियंता सचिन पावरा, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील, सचिव भिक्कन पाटील, वैज्ञानिक अधिकारी चंद्रशेखर पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, ग्रामसेवक श्री.गावीत, तलाठी श्री.डिंगराळे आदी उपास्थित होते.

VISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षितता व दर्शनासंदर्भातील माहिती जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, रविवार व गुरुवार या दिवशी गर्दी वाढते त्या दिवशी विशेष दक्षता घ्यावी. याठिकाणी येणार्‍या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विज, बस वाहतूक, पार्किग, आरोग्य आदी सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात अशा सुचना दिल्या.

मू.जे. महाविद्यालय ‘कंदील’ एकांकिकेचा पनवेलमध्ये डंकादोंडाईचात किराणा दुकानदाराकडे दोन लाखांची घरफोडी

अश्व बाजाराची पाहणी

श्रीमती खत्री यांनी अश्व बाजाराची पाहणी केली. अश्व बाजारात देशातील विविध भागातून देखणे अश्व येथे दाखल होत आहेत. पशुसंवर्धन विभागाने अश्वांची तपासणी, निगा, आरोग्याबाबत सूचना दिल्या. रायडिंगबाबत माहिती घेतली. रायडिंग करणार्‍यांना हेल्मेट देण्याची गरज व्यक्त केली. अश्व बाजारात धुळ उडू नये याची काळजी घ्यावी, तसेच चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी चेतक फेस्टिव्हलमध्ये होणार्‍या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्या.

थरार : चालत्या कारने घेतला पेट

- Advertisment -

ताज्या बातम्या