Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारआदिवासी संघटनांतर्फे रॅली

आदिवासी संघटनांतर्फे रॅली

सारंगखेडा – Sarangkheda – वार्ताहर :

सारंगखेडा ता. शहादा येथील घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटना, एकलव्य दल,एकलव्य आदिवासी क्रांती दल, अखिल भारतीय युवा कोळी समाज नंदुरबार

- Advertisement -

यासह विविध संघटनांच्यावतीने अल्पवयीन मुलीच्या खुन प्रकरणी दोषी नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन व घोषणा देत घटनेच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.

सारंगखेडा ता. शहादा येथे दि. 23 शुक्रवारी रोजी मध्यरात्री घडलेल्या प्रेमसंबंधाच्या नकारावरून एका अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या निषेधार्थ सारंगखेडा येथे आदिवासी संघटना, एकलव्य दल,एकलव्य आदिवासी क्रांती दल ,अखिल भारतीय युवा कोळी समाज नंदुरबार यासह विविध संघटनांनी दोषी नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत गावात सारंगखेडा येथे रॅली काढली व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जमावा कडून तोडफोड

सारंगखेडा तापी पुला पासून निषेधार्थ रॅलीची सुरुवात झा ली. रॅली बाजार चौकातून पुढे जात असतांना अचानक बाजार पेठेतील व ग्रामपंचायत चौकातील दुकानांवर अज्ञातांनी दगड फेक केली.यासह आरोपीच्या घराची नासधुस करण्यात आली . या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसांकडून पंचनामे करुन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .

पोलीस अधिक्षकांची भेट

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी भेट देऊन पिडीत मुलींच्या कुटुंबांची भेट घेतली त्यावेळी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. रमेश कदम , अतीरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार , पोलीस निरिक्षक नजन पाटील .स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने किशोर नवले , पोलीस निरिक्षक चंद्रकांत सरोदे उपस्थित होते.

सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री अकरा वाजता पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपी किशोर शिवदास वडर याला न्यायालयात हजर केले असता दि.28 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या