Friday, April 26, 2024
Homeनगरसराला बेटावरील साई समाधी शताब्दी भक्त निवासाचे आज लोकार्पण

सराला बेटावरील साई समाधी शताब्दी भक्त निवासाचे आज लोकार्पण

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

शिर्डी येथे साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या 171 व्या अखंड हरिनाम सप्ताहातून

- Advertisement -

शिल्लक राहिलेल्या देणगीतून सरालाबेट येथे उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य साई समाधी भक्तनिवास गुरुवार दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

श्रीक्षेत्र सराला बेटचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते ही भव्यदिव्य वास्तू गुरुवारच्या मुहुर्तावर दुपारी 12 वाजता उद्घाटनानंतर भक्तार्पण केली जाणार आहे. याचवेळी श्री साईबाबांच्या मूर्तीचा स्थापन सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे. या भक्त निवासच्या रुपाने शिर्डीकरांनी केलेला संकल्प पूर्ण होत आहे.

सन 2018 साली साईबाबांच्या समाधीस शतकपूर्ती झाली होती. त्यानिमित्ताने शिर्डीत 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2018 दरम्यान योगिराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 171 वा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. अतिशय शांततेत मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच शिर्डी सप्ताह कमिटीकडून जमा झालेल्या देणगीचा पै पै चा हिशोब सर्वांसमोर मांडून एक वेगळा आदर्श निर्माण केला. 171 व्या सप्ताहातून शिल्लक राहिलेल्या देणगीतून श्री साई समाधी शताब्दी आश्रम श्रीक्षेत्र सराला बेट येथे बांधण्यात येईल, असा जो संकल्प शिर्डीकरांनी केला होता.

सरला बेट येथे भव्यदिव्य असे भक्तनिवास साईसमाधी शताब्दी आश्रमच्या निमित्ताने उभारण्यात आला असून याचा भक्तार्पण सोहळा संपन्न होऊन शिर्डीकरांची संकल्पपूर्ती यानिमित्ताने होत आहे. भाविकांसाठी हे भक्तनिवास गुरुवारपासून खुले होत असून भव्य कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे, आ. आशुतोष काळे, आ. रमेश बोरनारे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, तसेच शिर्डी परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या