Sunday, April 28, 2024
Homeजळगावपांढऱ्या दुधाच्या काळा धंदा करणारा मुख्य सूत्रधार सारा भरवाड फरारच?

पांढऱ्या दुधाच्या काळा धंदा करणारा मुख्य सूत्रधार सारा भरवाड फरारच?

अरुण पाटील

यावल Yaval

- Advertisement -

तालुक्यात भेसळयुक्त दूध (Adulterated milk) पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते असे ठळक वृत्त दैनिक देशदूत मधून प्रसिद्ध केले होते. अन्न व भेसळ प्रशासन (Food and adulteration administration) विभाग जळगाव यांच्याशी प्रत्यक्ष फोनवरून संपर्कही साधला होता मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे (negligence of the authorities) सदर कुंड्यापाणी येथील “पांढऱ्या दुधाचा काळा धंदा ” (Black business of white milk) कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना उशिरा का होईना मात्र लक्षात आला? त्यात मुख्य आरोपी फरार (main accused is absconding) असून पोलिस प्रशासनापुढे (Police administration) त्यांनी जणू आव्हानच (challenge) दिले आहे

यावल तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध (Adulterated milk) तयार केले जाते व यावल फैजपूर सावदा सह इतरत्र शहरात व गावागावात पाठविले जाते असे ठळक वृत्त फक्त “दैनिक देशदूत ” मधूनच प्रसिद्ध झाले होते . या वृत्तामुळे यावल तालुक्यात मुक्त दूध तयार करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती व दैनिक देशदूतने वाचा फोडल्यामुळे सामूहिक वाचन हि वाचकांनी केले होते.

यासंदर्भात यावल येथील काही शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे अन्न व भेसळ प्रशासन जळगाव अधिकारी यांचेशी संपर्क साधून याबाबत विचारना केली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कानाडोळा (negligence of the authorities) केला. असा कानाडोळा केल्यामुळेच अश्या गोरखधंदा वाल्यांना फावले सुद्धा .
त्या वेळी सदर ठळक वृत्त प्रसिद्ध होताच चिंचोली, मनवेल, दहिगाव, मोहराळा, किनगाव, परिसरात अशी काही भेसळयुक्त दूध (Adulterated milk) तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते व त्यांनी सदर चा धंदा काही दिवस बंद केला.

यावल आणि सावदया कडे जाणाऱ्या ज्या प्रायव्हेट दुधाच्या गाड्या आहेत त्यावर निश्चितच त्यावेळी सुद्धा परिणाम झाला होता. 24 मार्च 22 चे रात्री चोपडा आणि यावल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बिडगाव शिवारात सातपुडा पर्वत रांगेला लागूनच असलेल्या कुंड्यापाणी येथून भेसळयुक्त दूध (Adulterated milk) तयार करणाऱ्यांच्या पोलीस प्रशासन (Police Administration) व अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) यांच्या अधिकाऱ्यांनी रात्री छापा (raid) घातला त्यात भिकन अशोक साळुंके ( वय 25 ) हर्षल पंढरीनाथ पाटील ( वय 18 राहणार दोघे चिंचोली तालुका यावल ) तसेच हेमंत रतिलाल महाजन (धानोरा तालुका चोपडा ) यांना ताब्यात घेऊन अटक (Arrested) केली होती त्यां तिघांना पोलिस कस्टडी ही मिळाली आता सब जेल मध्ये न्यायालयीन कोठडी मध्ये त्यांची रवानगी झालेली आहे.

अद्याप जामीन त्यांना मिळालेला नाही मात्र मुख्य आरोपी (main accused) सारा बुटा भरवाड (Sara Buta Bharwad) पळासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे नेमका त्याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही

पोलीस प्रशासन यांनी बिडगाव शिवारातील कुंड्यापाणी येथील संभाजी मोतीराम पाटील (Sambhaji Motiram Patil) यांच्या मालकीच्या शेतात (field) लक्ष्मण भरवाड यांच्या हस्तका मार्फत खाद्यतेल दूध पावडर मिक्सर दुधाच्या कॅना, बादल्या, दोन वाहने दूध वाहतुकीसाठी, व मोबाईल असा जवळजवळ सव्वा अकरा लाखाचा मुद्देमाल (Issue) 24 मार्च 22 रोजीचे रात्री जप्त केलेला आहे.

याचा धंदा कधीपासून या परिसरात सुरू आहे? कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याने आत्तापर्यंत भेसळयुक्त दुधाचे पांढऱ्या दुधाचा काळा धंदा (Black business of white milk) केला? कोणत्या डेअरी मध्ये त्याने आतापर्यंत भेसळयुक्त दूध पाठवले? सदर डेअरी चालकांना (Dairy drivers) हे दूध भेसळयुक्त आहे असे मशीन मध्ये का समजले नाही? त्या डेअरीचे चालक ही त्यात सामील आहेत का? आतापर्यंत किती लोकांच्या जीवनाशी त्याने खेळ मांडला? हे जेव्हा मुख्य आरोपी सारा बुटा भरवाड राहणार पळासनेर हा पकडला जाईल तेव्हाच खरी माहिती पोलिसांना (police) मिळेल.
चिंचोली परिसरातून खाजगी गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर दूध फैजपूर व यावल सावदा परिसरातही पाठविले जाते नेमके ते दूध कोणत्या कोणत्या डेऱ्यांमध्ये उतरवले जाते . त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि जनतेच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अश्या भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश नेहमी सतत करत राहावा अशी अपेक्षा यावल रावेर तालुक्यातील जनतेकडून प्रशासनासमोर केली जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या