Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी गड सज्ज

नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी गड सज्ज

कळवण । प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत व आद्य शक्तीपीठ म्हणुन तिर्थक्षेत्र सप्तशृंगगडाची (Saptshung Gadh) ओळख आहे. या ठिकाणी २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी (Navratrasova) व्यापारी दुकानांची लगबग सुरु झाली असुन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मिना (भाप्रसे) (Vikas Mina) यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली…

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर हा यात्रोत्सव बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता करोनाच्या नियमावरील निर्बंध रद्द केल्याने गडावरील नवराञ उत्सव होणार आहे. मंदिरात भक्तांना सुलभ दर्शन घेण्यासाठी बॅरॅकेटस मधुन सोडण्यात येणार आहे.

तसेच मंदिर परिसरासह विविध ठिकाणी २५६६ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. तर प्रवेशद्वारजवळ नियोजन कक्ष स्थापन करण्यात येणार असून मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

तसेच यावेळी वनविभाग हद्दीत बाहेरून आलेल्या दुकानदारांना दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर नांदुरी ते सप्तशृंगगड या १० किलोमीटर अंतरावरील घाटात येण्या जाण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

याशिवाय नांदुरी (Nanduri) येथे मेळा बसस्थानकाची स्थापना करण्यात आली असून गडावरही बसस्थानकाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर नांदुरी ते सप्तशुंगगड दरम्यान ७० बसेसची व्यवस्था करण्यात आली असून इतर ठिकाणाहून २०० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तर १ अप्पर पोलीस अधीक्षक, २ डी वाय एस पी, १२ पोलिसांसह २५० होमगार्ड बंदोबस्तासाठी असणार आहे. तसेच वनविभागाचे १५ कर्मचारी उपस्थित राहणार असून मंदिर परिसरात घाण कचरा होऊ नये याबाबत खबरदारी घेण्यासाठी अन्न प्रशासनाचे ६ कर्मचारी हजर राहणार असून गावातील सर्व खाद्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

याशिवाय ग्रामपंचायतमार्फत साफसफाईसाठी ६० कर्मचारी ठेवण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. तसेच ५ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारले जाणार असून नांदुरी येथे आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी तहसीलदार बंडु कापसे (Tehsildar Bandu Kapse) उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड (Amol Gaikwad) गटविकास अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, यांच्यासह अन्नप्रशासन, आरोग्य, विभागाचे अधिकारी यांच्यासह सप्तशुंगगड, नांदुरी ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व देवी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या