Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगी देवीचे मंदिर दीड महिना बंद; भाविकांसाठी केली 'अशी' व्यवस्था

सप्तशृंगी देवीचे मंदिर दीड महिना बंद; भाविकांसाठी केली ‘अशी’ व्यवस्था

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच काल (दि ११) रोजी सप्तशृंगी गडावर भाविक परतीच्या मार्गाने खाली उतरत असताना भिंत तोडून पावसाचे पाणी पायऱ्यांवरून खाली आले. या दुर्घटनेत सहा भाविक जखमी झाल्याची घटना घडली. या हंगामातील पावसामुळे गडावर जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. २१ जुलै पासून पुढील ४५ दिवस बंद राहणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून देण्यात आली आहे…

- Advertisement -

याकाळात केवळ मंदिर बंद असेल. येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे.

यासोबतच तसेच भाविकांना दिल्या जाणान्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असेल असेही मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मुर्तीचे संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कार्यरत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी, पवई (बॉम्बे) यांच्यासह अजिक्यतारा कन्सल्टंसी यांच्यामार्फत पुर्तता तसेच तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने कामे केली जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या