Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगीदेवीचे दर्शन ऑनलाईन पासनंतरच, जाण्यापुर्वी वाचा ही नियमावली

सप्तशृंगीदेवीचे दर्शन ऑनलाईन पासनंतरच, जाण्यापुर्वी वाचा ही नियमावली

सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrung gad

सप्तशृंगी निवासनी देवी नवरात्रोत्सव (Navaratrotsav 2021) येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यंदाचा नवरात्रोत्सव सालाबादप्रमाणे यात्रा प्रकारात होणार नाही. भाविकांना श्री भगवती दर्शन आता केवळ ऑनलाईन दर्शन पासद्वारेच घेता येणार आहे…

- Advertisement -

www.saptashrungi.net या संकेतस्थळावरुन भाविकांना दर्शन पास मिळवता येईल. तसेच भाविकांने पुढील सूचनांचे पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

कालिका मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात भरावे लागणार शुल्क

ही आहे नियमावली

१)ऑनलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास १२०० प्रमाणे भाविकांना श्री भगवतीचे दर्शन घेता येणार

२) भाविकांनी ऑनलाईन पासवर निर्धारीत करुन दिलेल्या वेळेच्या (स्लॉट) किमान १ तास अगोदर नांदुरी येथे पोलीस व महसूल प्रशासनामार्फत पासची तपासणी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनाने किमान अर्धातास अगोदर मौजे सप्तशृंगगड येथे दर्शन रांगेत उपस्थित राहणे आवश्यक.

३) श्री भगवतीचा ऑनलाईन दर्शन पास हा नांदुरी ते सप्तशृंगगड बसने येतांना बसमध्ये दाखविणे अनिवार्य

४) भाविकाचे वय किमान १० वर्षापेक्षा अधिक व वय वर्षे ६५ पेक्षा कमी असणे आवश्यक

५) भाविकाचे करोना प्रतिबंधक लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण असणे आवश्यक

६) ज्या भाविकांचे दोन्ही डोस पुर्ण नसतील अशा भाविकांनी ७२ तासातील आर टी पीसीआर तपासणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक

७) नवरात्रोत्सव कालावधी दरम्यान दि. ०७/१०/२०२१ ते दि. १५/१०/२०२१ व दि. १९/१०/२०२१ ते दि. २०/१०/२०२१ या कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतुकीसाठी बंद

८) भाविकांना करोना संदर्भातील नियमानुसार मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक

९) भाविकांनी जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विविध सुचनांची/अटी व शर्तीची निर्धारीत पुर्तता करुन आवश्यक सहकार्य देणे अपेक्षित आहे.

सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

…यांना संपर्क साधा

ऑनलाईन दर्शन पास संदर्भात निर्धारीत प्रक्रीया कशी असेल याबाबतचे तपशिल व्हीडीओ व प्रझेंटेशन प्रकारात विश्वस्त संस्थेच्या संकेतस्थळासह फेसबुक व इतर सोशल मिडीयावर माहितीसाठी सादर करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन पास संबंधित तांत्रिक अडचण उदभवल्यास प्रशांत दामरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या